तासनतास बर्फाच्या टबमध्ये बसतो हा Ice Man, बर्फातच करतो योगा आणि आता उघड्या अंगाने बर्फात धावून केला विक्रम
जगभरात Ice Man म्हणून ओळखले जाणाऱ्या विम हॉफ (Wim Hof) यांनी उघड्या अंगाने फक्त हाफपँट घालून पायात शूजसुद्धा न घालता बर्फात 21 किमी धावण्याचा विक्रम केला. पाहा त्यांचे हे अचाट PHOTO


कडाक्याच्या थंडीमध्ये पोलर सर्कलमध्ये विना कपड्याचा आणि विना शूजचा 21 किलोमीटर धावणारा हा माणूस आहे विम हॅाफ (Wim Hof). विम कधी कपडे न घालता माउंट एव्हरेस्टच्या (Mount Everest) बर्फाळ टेकड्यांवर चढाई करण्यासाठी जातात तर कधी घरात बर्फाने भरलेल्या टबमध्ये तासनतास बसतात. Ice man म्हणून त्याचीं ख्याती आहे.(छायाचित्र : ट्विटर)


विम यांनी 2007 मध्ये माउंट एव्हरेस्टवर 7200 मीटर उंचीपर्यंत (23,600 फूट) चढाई केली होती. यावेळी त्यांनी कपडे आणि शूज घातले नव्हते. एवढी चढाई केल्यानंतर ते गंभीर जखमी झाले आणि त्यांना मोहीम अर्ध्यावरच सोडावी लागली. त्यांच्या जीवनावर पत्रकार स्काट कार्नी यांनी व्हाॅटस डोन्ट किल नावाचे पुस्तक लिहिले आहे. (छायाचित्र : ट्विटर)


विम यांनी नुकताच 21 किमी बर्फावरून अनवाणी धावण्याचा विक्रम केला अर्थात शर्ट न घालता. ‘जिंकण्यासाठी आपण मानसिकता आणि भय या दोन गोष्टींवर विजय मिळवणे गरजेचे आहे’, असं म्हणत त्यांनी ख्रिसमसच्या शुभेच्छा बर्फाने भरलेल्या टबमध्ये बसून दिल्या. (छायाचित्र : ट्विटर)


विम यांचा जन्म 20 एप्रिल 1959 मध्ये झाला. कडाक्याची थंडी सहज सहन करणारी व्यक्ती म्हणून त्यांची ओळख आहे. विम यांनी बर्फाखाली पोहण्याचं गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड केले आहे. (छायाचित्र : ट्विटर)