

भारताची वाढती लोकसंख्या पाहता आता हम दो हमारे दो म्हणण्याची वेळ आली आहे. त्यातही वाढत्या महागाईमुळे आता लोक हमारे दो वरून आता एकच मुलं बरं आहे असं म्हणतात. पण एक असा देश आहे ज्या देशामध्ये 4 मुलांना जन्म दिल्यानंतर तुम्हाला टॅक्स द्यावा लागणार नाही.


शहरातील लोकसंख्या वाढवण्यासाठी लोकांना प्रोत्साहित करण्यासाठी सरकारने ही योजना आखली आहे. या योजनेअंतर्गत 4 पेक्षा जास्त मुलं होणाऱ्या कुटुंबाला आयकर द्यावा लागणार नाही.


युरोपमधील हंगरीच्या पंतप्रधान विक्टर ओर्बन यांनी रविवारी दिलेल्या त्यांच्या भाषणावेळी ही घोषणा केली आहे.


ते त्यांच्या भाषणात म्हणाले की, जी महिली 4 पेक्षा जास्त मुलांना जन्म देईल तिला आजीवन आयकर द्यावा लागणार नाही. या व्यतिरिक्त जास्त मुलं असणाऱ्या कुटुंबाला आर्थिक मदत आणि सबसीडीदेखील दिली जाईल.


या निर्णयामुळे हंगरीमध्ये लोकसंख्या कमी होण्याचं प्रमाण संपेल. हंगरीचे पंतप्रधान युरोपियन युनियनच्या इतर देशांमधून आश्रय घेतलेल्या धोरणांच्या विरोधात आहे. त्यांनी निर्वासित समस्येचा विरोध केला आहे.


ओर्बन यांच्या म्हणण्यानुसार, हंगेरीने युरोपच्या मूळ लोकसंख्येच्या कमतरतेला उत्तर दिले आहे. त्यांचा शरणार्थी लोकांशी काहीही संबंध नाही. त्याने आपल्या भाषणात म्हटले होते की, युनियनच्या नेत्यांना युरोपला इतर महाद्वीपांमधून आलेल्या लोकांनी भरून टाकायचे आहे.


हंगेरियन पंतप्रधानांनी सांगितले की, ज्या प्रवासी लोकांमुळे युरोपच्या देशांमध्ये मिश्रित लोकसंख्या झाली आहे. यामुळे या देशांमध्ये मुस्लिम वर्चस्व निर्माण होईल आणि लवकरच ख्रिस्ती अल्पसंख्याक होतील.


त्यामुळे आपल्या देशातील लोकसंख्या वाढवण्यासाठी ही वेगळी योजना युरोप सरकारकडून राबण्यात येत आहे.