

डेंग्यू हा विषाणू पासून होणारा आजार आहे. एडीस ईजिप्टाय डासांमार्फत त्याचा प्रसार होतो. फक्त घाण पाण्यातच नव्हे तर स्वच्छ पाण्यातसुद्धा या डासांची उत्पत्ती होते. त्यामुळे स्वच्छतेला जास्त महत्त्व द्यायला हवं. डेंग्यूच्या रुग्णांसाठी पपईचं झाड हे संजीवनी आहे. डेंग्यू झालेल्या रुग्णाला पपईच्या पानांचा रस दिला तर त्याचे काय फायदे होतात हे आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.


रुग्णाच्या लक्षणांवरूनच डेंग्यूचा उपचार केला जातो. डेंग्यू झालेल्या रुग्णाला पहिल्या दोन आठवड्यात खूप जास्त ताप येतो. त्याच्या शरीरातल्या प्लेटलेट्स झपाट्याने कमी होतात.


डेंग्यूच्या रुग्णासाठी पपईच्या पानांचा रस अत्यंत गुणकारी आहे. पपईच्या पानांमध्ये chymopapin आणि papain असे दोन एंजाईम्स असतात. जे शरीरातील रक्त प्रवाही ठेवतं. तसंच झपाट्याने कमी झालेल्या रक्तातल्या प्लेटलेट्स वाढवण्याचं काम करतात.


असा घ्या पपईचा रस - पपईची कोवळी पानं खुडून त्याचे देठ काढून घ्यावे. फक्त पानं स्वच्छ धुवून घ्यावीत. त्यानंतर मिक्सरमध्ये थोडं पाणी टाकून त्याची पेस्ट तयार करावी. त्यानंतर या मिश्रणामध्ये मीठ आणि थोडी साखर मिसळू घ्यावी. त्यानंतर हे मिश्रण दिवसातून दोनवेळा रुग्णाला प्यायला द्यावं.


रुग्णाला कोणत्या टप्प्यात द्यायचा - डेंग्यूची लक्षणं दिसताच शक्य तितक्या लवकर रुग्णाला पपईच्या पानांचा रस द्यायला सुरूवात करावी. प्लेटलेट्स दिड लाखांपेक्षा कमी होण्याआधी रुग्णाला हा रस द्यावा. कारण आजाराची गंभीरता वाढल्यास त्याचा उपयोग होत नाही.