

मुंबई, 8 मे : अन्न गरम असेल तर प्रत्येक आई आपल्या बाळाला फुंकर घालून ते भरवते. मात्र, तुम्ही घेत असलेली ही काळजी त्यांच्या आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते. जाणून घ्या असं केल्याने कोणते गंभीर आजार त्यांना होऊ शकतात.


फुंकर घातल्याने तुमच्या तोंडातील बॅक्टेरिया बाळाभा भरवत असलेल्या अन्नावर पोहोचतात. जेव्हा तुम्ही ते अन्न बाळाला भरवता तेव्हा ते बॅक्टेरिया त्याच्या पोटात जातात. जर तुमच्या दातांमध्ये कॅव्हिटी असेल तर त्याचं गंभीर परिणाण बाळाला भोगावे लागू शकतात.


जर अन्नाच्या माध्यमातून दात येण्याअगोदरच बाळाच्या तोंडात बॅक्टेरिया पोहचले, तर त्याच्याही तोंडात प्लाक तयार व्हायला सुरूवात होते. त्यामुळे आलेल्या दातांना 4-5 महिन्यातच कॅव्हिटी लागते आणि ते ठिसूळ बनतात.


बाळाला भरवताना चमचा स्वच्छ आहे की नाही, उष्टा तर नाही ना? याची काळजी घ्या. तसंच बाळाला उष्टं अन्न किंवा पाणी अजिबात देऊ नका.