

कॉलेजमधली लव्ह स्टोरी ‘टार्जन- द वंडर कार’ सिनेमातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी आएशा टाकिया आज तिचा ३३ वा वाढदिवस साजरा करत आहे. पहिल्या सिनेमासाठी तिला फिल्मफेअरचा बेस्ट डेब्यू अवॉर्ड मिळाला होता. आएशा तिच्या सिनेमांपेक्षा विवादांमुळेच जास्त लक्षात राहिली.


११ एप्रिल १९८६ मध्ये गुजरातमध्ये जन्मलेल्या आएशाने वयाच्या १५ व्या वर्षी अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. आएशा सर्वातआधी कॉमप्लॅनच्या जाहिरातीत दिसली होती. त्यानंतर ती फाल्गुनी पाठकच्या 'मेरी चुनरी उड उड जाए' गाण्यात दिसली होती.


गेल्या काही वर्षांपासून तिने सिनेजगतापासून दूरच राहणं पसंत केलं आहे. २००९ मध्ये आलेल्या 'वॉन्टेड' सिनेमात तिने सलमान खानसोबत काम केलं होतं.


तसेच २००८ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'संडे' सिनेमातही तिची महत्त्वपूर्ण भूमिका होती. या सिनेमात तिच्यासोबत अजय देवगण आणि इरफान खानही होता.


याचकाळात ती ब्रेस्ट इम्प्लांटमुळे चांगलीच चर्चेत आली होती. या १० वर्षात तिच्या लुकमध्ये खूप बदल झाला आहे. तिच्यातल्या बदलामुळेच ती आजही चर्चेत राहते.


२००९ मध्ये समाजवादी पार्टीचे नेते अबू आझमी यांचा मुलगा फरहान आझमीशी लग्न केलं. २०११ मध्ये नागेश कुकन्नूरच्या 'मोड' सिनेमानंतर आएशाने सिनेजगताला अलविदा म्हटलं.


सिनेमांपेक्षा ती कॉन्ट्रोव्हर्सीमुळेच लक्षात राहिली. सासरे आणि समाजवादी नेते अबू आझमी यांनी बलात्कारावर दिलेल्या वक्यव्यामुळे तिला सोशल मीडियावर ट्रोल करण्यात आलं होतं. यानंतर तिने ट्विटरवर सर्वांची माफी मागितली होती.