

बॉलिवूड स्टार अभिषेक बच्चन आज त्याचा ४२ वा वाढदिवस साजरा करत आहे. अभिषेक जेवढा त्याच्या सिनेमांसाठी चर्चेत असतो त्याहून जास्त तो त्याच्या खासगी आयुष्यासाठी चर्चेत असतो.


ऐश्वर्या राय आणि सलमान खानच्या अफेअरबद्दल तर साऱ्यांनाच माहीत आहे. आजही जर सलमान- ऐश्वर्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहत असतील तर तो चर्चेचा विषय होतो.


अशावेळी अभिषेक जर सलमानबद्दल काही बोलला तर चर्चा तर होणारच ना... २०१७ मध्ये एका कार्यक्रमात अभिषेकने असंच काहीसं केलं.


स्टारडस्ट पुरस्कार सोहळ्यात अमिताभ बच्चन सहकुटुंब आले होते. यावेळी सलमान खानही उपस्थित होता. यावेळी अभिषेकने सलमानची थट्टा उडवली. यावर ऐश्वर्याही जोरजोरात हसली.


अभिषेक बच्चन आणि रितेश देशमुख या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करत होते. तेव्हा अभिषेकने नोटबंदीवरून सलमानची मस्करी केली.


अभिषेक म्हणाला की, ‘सलमान रांगेत उभं राहण्याऐवजी सरळ बँकेत जातो आणि म्हणतो की, मुझ पर एक एहसान करना की मुझपर कोई एकसान मत करना.’


यानंतर अभिषेकने अमिताभ यांच्याबद्दल बोलतानाही म्हटलं की, ‘ते जर असते तर म्हणाले असते की, लाइन वहीं से शुरू होती है जहां से हम खडे होते है.’


या सर्व गोष्टी अभिषेक मस्करीत म्हणाला होता. यावर सर्वच हसत होते आणि टाळ्या वाजवत होते. मात्र ऐश्वर्याची प्रतिक्रिया सर्वांना पाहायची होती.