

गुगलने एक अफलातून फिचर असलेला एक स्मार्टफोन बाजारात आणला आहे. यामुळे मोबाईलमध्ये उत्तम कॉलीटीचा कॅमेरा देणारी कंपनी अशीही गुगलची ओळख निर्माण झाली आहे.


गुगलने Google Pixel 3 या आपल्या स्मार्टफोनमध्ये किस करताच फोनमधला कॅमेरा तात्काळ फोटो काढेल असं लेटेस्ट फिचर जोडलं आहे. कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित असलेलं हे अफलातून फिचर 'Photobooth Mode' या नावानं ओळखलं जातं.


या फिचरचा जर तुम्हाला उपयोग करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या पिक्सल 3 स्मार्टफोनचं फोटोबूथ मोड ऑन करावं लागेल. त्यानंतर हावभाव पाहताच मोबाईलमधला कॅमेरा समजून घेईल की तुम्हाला फोटो काढायचा आहे आणि त्याचक्षणी तो फोटो क्लिक करेल.


गुगलने आपल्या या स्मार्टफोनमध्ये किस डिटेक्शनचं फिचर जोडलं आहे. जेव्हा तुम्ही तुमच्या खास व्यक्तीला KISS कराल तेव्हा तात्काळ तुमचा फोटो निघेल असा दावा कंपनीने केला आहे.


AI किसिंग डिटेक्शन मोडमुळे या स्मार्टफोनमधील कॅमेरा समोरच्याचे हावभाव डिटेक्ट करतो आणि तात्काळ फोटो घेतो. एरवी असे फोटो काढताना होणारी अडचण आता या मोबाईलमुळे कपल्सला होणा नाही असा दावा कंपनीने केला आहे.