3.3 सेकंदात 0-100 kmph सुसाट, भारतात आली BMW ची नवी 'Dhoom' बाइक!
धूम सिनेमात आमिर खानने BMW ची BMW K1300R ही बाइक वापरली होती. आता BMW ने जगभरात सर्वात जास्त विकली जाणारी ही MW S 1000 XR भारतात लाँच केली आहे.
|
1/ 8
जर्मन लग्झरी कार निर्माता कंपनी बीएमडब्ल्यू (BMW) ने आंतरराष्ट्रीय स्तरावर सर्वात जास्त विक्री होणाऱ्या अॅडव्हेंचर स्पोर्ट बाइक, बीएमडब्ल्यू एस 1000 एक्सआर (BMW S 1000 XR) चे नवीन व्हर्जन भारतात लाँच केले आहे.
2/ 8
BWM S 1000 XR मध्ये 999 cc, इन-लाइन फोर-सिलेंडर इंजिन दिले आहे. जे BMW S 1000 RR वर आधारित आहे. हे इंजिन 11,000 rpm वर 165 bhp इतकी पॉवर देत आणि 9,250 rpm वर 114 Nm इतका टॉर्क जनरेट करतो.
3/ 8
ही बाइक 0 ते 100 kmph इतका वेग गाठण्यासाठी बाइकला फक्त 3.3 सेकंद लागेल, असा दावा कंपनीने केला आहे.
4/ 8
या बाइकचा टॉप स्पीड आहे तब्बल 200 किमी प्रतितास.
5/ 8
या बाइकची किंमत 20.9 लाख रुपये इतकी असणार आहे.
6/ 8
बीएमडब्ल्यू एस 1000 एक्सआर मध्ये डायनामिक ब्रेक कंट्रोल (DBC) दिले आहे. नवीन 2020 BMW S 1000 XR च्या डिझाइनमध्ये काही बदल केले आहे. यात फ्रंट फेयरिंग, बॉडी पॅनल्स आणि फ्यूल टँक डिझाइनमध्ये नवीन बदल केले आहे. तसंच हेडलाइटही बदलण्यात आला असून पूर्णपणे LED दिला आहे.
7/ 8
नवी BMW S 1000 XR ही नव्या इंजिनसह बाजारात उतरवण्यात आली आहे. या बाइकचा परफॉर्मन्स, स्पोर्टी राइड आणि लांब प्रवासासाठी आरामदायी ठरेल.
8/ 8
ही एक पॉवर पॅक परफॉर्मर आहे, तुम्हाला बाइक चालवत असताना रेसट्रॅकचा अनुभव येईल, असा दावा कंपनीने केला आहे.