Change Language
होम » फ़ोटो गैलरी » बातम्या
1/ 6


ओडिशामध्ये फानी चक्रीवादळामुळे भुवनेश्वरचं रेल्वे स्टेशन पूर्णपणे उद्ध्वस्त झालं आहे. या स्टेशनचं छप्पर, भिंती आणि होर्डिंग्ज वादळामुळे उडून गेली.
2/ 6


जगन्नाथपुरी आणि पुरीजवळच्या भागांत 245 किमी प्रतितास एवढ्या प्रचंड वेगाने वारे वाहत होते. भुवनेश्वरला या वादळाचा जोरदार तडाखा बसला
3/ 6


भुवनेश्वर रेल्वे स्टेशनजवळ झाडं पडली आणि विजेचे खांबही मोडून पडले. हे वादळ ओसरेपर्यंत लोकांना रेल्वेस्टेशनच्या परिसरात जायला मनाई करण्यात आली आहे.
4/ 6


भुवनेश्वर रेल्वे स्टेशनच्य प्लॅटफॉर्म नंबर 1 चं छप्पर पूर्णपणे उडून गेलं. काही ठिकाणी बस आणि क्रेन उलटण्याच्याही घटना घडल्या.
5/ 6


फानी वादळाच्या बचावकार्यासाठी NDRF ची पथकं ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. रेल्वे प्रशासन ढिगारे हटवण्याचं काम करतं आहे.