

अरविंद केजरीवाल यांच्या दिल्ली सरकारने इलेक्ट्रिक वाहन धोरण (Delhis electric vehicle policy) आणखी प्रभावीपणे जाहीर केले आहे. त्यामुळे दिल्लीकरांना आता दुचाकी आणि तीनचाकी इलेक्ट्रिक वाहन खरेदी करण्यास आणखी सोईचे झाले आहे. दिल्ली सरकारकडून दुचाकी आणि तीन चाकी वाहनावर 30 हजार रुपये तर चार चाकी वाहनावर 1.5 लाख रुपये सबसिडी देणार आहे.


पुढील पाच वर्षात 5 लाख इलेक्ट्रिक वाहनांची विक्री होईल अशी अपेक्षा केजरीवाल यांनी व्यक्त केली आहे. या नव्या धोरणाची अंमलबजावणी करण्यासाठी एक ईव्ही सेल स्थापन करण्यात येणार आहे. या योजनेतून रजिस्ट्रेशन चार्ज सुद्धा माफ करण्यात आले आहे. एवढंच नाहीतर रोड टॅक्समध्येही सूट दिली आहे.


दिल्लीत एका वर्षाच्या आत 200 चार्जिंग स्टेशन उभारले जाणार आहे. सोबतच प्रत्येक 3 किलोमीटर अंतरावर एक एक चार्जिंग स्टेशन असणार आहे. त्यामुळे कार चार्जिंगसाठी आणखी सोईस्कर होईल. तसेच एक स्टेट इलेक्ट्रिकल व्हेईकल बोर्ड तयार करण्यात येणार आहे. याचे अध्यक्ष हे राज्य परिवहन मंत्री असणार आहे.


जर तुमच्याकडे एखादी जुनी गाडी असेल तर ती देऊन तुम्ही नवी इलेक्ट्रिक कार खरेदी करणार असाल तर त्यातून काही रक्कमही वजा केली जाईल आणि दुसरीकडे सबसिडीही मिळेल.