PHOTO: अफगाणिस्तानात भूकंपाचा धक्का; 300 नागरिकांचा मृत्यू तर घराचे नुकसान
काल रात्री अफगाणिस्तानातील पाक्तिता प्रांतात झालेल्या भूकंपामुळे (Afganistan Earthquake) 280 पेक्षा जास्त मृत्यू तर 500 पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत.
|
1/ 5
अफगाणिस्तानामध्ये आज सकाळी भूकंपामुळे खूप मोठा नुकसान झाले आहे. काबूल रिपोर्टनुसार या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल एवढी होती. यात 280 लोकांचा मृत्यू तर 500 पेक्षा अधिक लोक जखमी झाली आहे.
2/ 5
युरोपियन मेडिटेरेनियन सिस्मोलॉजिकल सेंटरच्या माहितीनुसार 500 किमीच्या अंतरावर भूकंपाचे क्षेत्र जाणवले. यामुळे पाकिस्तान आणि भारतातही भूकंपाचे झटके जाणवले.
3/ 5
काल रात्री पाक्तिता प्रांतातील चार जिल्ह्यात भूकंप झाला. यात शेकडो नागरिक मारले गेले, तसेच जखमी झाले. अफगाणिस्तानचे प्रवक्ते बिलाल करिमी जगाकडे मदतीची मागणी केली आहे.
4/ 5
अफगाणिस्तानच्या सरकारी न्यूज एजन्सीचे रिपोर्टर अब्दुल वाहिद रायनने ट्विट केले की, पाक्तिता येथील बरमल, जिरुक, नाका आणि ज्ञान येथील लोकांचा बाहेर काढण्यासाठी सुरक्षा दलाचे हेलिकॉप्टर बोलवण्यात आले आहे.
5/ 5
पाकिस्तानी मिडीया रिपोर्टसनुसार इस्लामाबाद, पेशावर, रावळपिंडी आणि मुलतान येथेही भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. याआधी गेल्या शुक्रवारी असेच भूकंपाचे धक्के जाणवले होते.