'धर्मवीर'नंतर प्रसाद ओकने अचानक आमूलाग्र बदलला लुक; समोर आले फोटो
ओळखू येणार नाही, असा बदल या अभिनेत्याने आपल्या लुकमध्ये केलाय, धर्मवीर चित्रपटातील प्रसादचा लुक आणि नुकताच त्यानं शेअर केलेल्या फोटोंमधील त्याचा अनोखा लुक दोन्हींमध्येही प्रसाद कडक दिसतोय खरा.
|
1/ 10
मराठी चित्रपट सृष्टीतील प्रसिद्ध अभिनेता प्रसाद ओक (Prasad oak) नेहमीच विविध कारणांमुळे चर्चेत असतो.
2/ 10
प्रसाद ओक सोशल मीडियाद्वारे चाहत्यांसोबत संवाद साधत असतो. निरनिराळे फोटो शेअर करत असतो.
3/ 10
नुकताच प्रसाद ओकचा 'धर्मवीर' चित्रपट प्रदर्शित झाला असून या चित्रपटाला भरपूर प्रतिसाद मिळत आहे.
4/ 10
धर्मवीर चित्रपटात प्रसादचा एक वेगळाच अंदाज पहायला मिळाला. आनंद दिघेंची भूमिका आणि त्यांचा लूक प्रसादने उत्तम केला. मात्र आता चित्रपट प्रदर्शित होऊन दीड महिना होत आला आणि प्रसादचा अनोखा अंदाज पहायला मिळत आहे.
यामध्ये प्रसादनं काळ्या रंगाचा टी-शर्ट आणि काळ्या रंगाची जीन्स घातली आहे. टी-शर्टवर लाल रंगाचं जॅकेट घातलं असून त्याचा हा लूक चाहत्यांना भुरळ घालतोय.
7/ 10
धर्मवीर चित्रपटातील प्रसादचा लूक आणि नुकताच त्यानं शेअर केलेल्या फोटोंमधील त्याचा अनोखा लूक दोन्हींमध्येही प्रसाद कडक दिसत आहे. मात्र दोन्हींमध्येही कमालीचा बदल दिसून येतोय.
8/ 10
उत्तम अभिनयशैली आणि दमदार दिग्दर्शन कौशल्यामुळे त्याच्यावर नेहमीच कौतुकाची थाप पडत असते.
9/ 10
प्रसादचं मराठी चित्रपट सृष्टीत मोठं योगदान असून त्यानं अनेक अफलातून चित्रपट या कलासृष्टीला दिले आहेत. यामध्ये नुकताच आलेला धर्मवीर असेल किंवा चंद्रमुखी, हिरकणी असेल. एकदम जबरदस्त चित्रपट देण्याचं तो काम करत असतो.
10/ 10
खासगी आयुष्याव्यतीरिक्त तो वैयक्तिक जीवनामुळेही अनेकवेळा चर्चेत राहिला आहे.