

सध्या अनेक लोक लग्नामध्ये अनोखी पद्धत वापरतात. ज्यामधून सामाजिक संदेश दिला जातो. असाच एक अगदी अनोखा लग्नसोहळा पार पडला. एका इंजिनिअर जोडप्याने थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या इच्छेनुसार विवाह केला आहे. मोदींच्या 'स्वच्छ भारत' योजनेचा आदर्श घेत ग्लोबल वॉर्मिंगचा संदेश देत या जोडप्याने विवाह केला आहे. त्यांच्या या अनोख्या लग्नाची सध्या जगभर जोरदार चर्चा आहे.


या लग्नाच्या निमंत्रण पत्रिकेचीही एक वेगळीच कमाल आहे. या जोडप्याने लग्नाची पत्रिका म्हणून लोकांना भगवत् गीता, जानवं आणि सुपारी दिली आहे.


बिहारच्या दरभंगा जिल्ह्यात राहणाऱ्या श्रवण आणि उत्तर प्रदेशमध्ये राहणारी रूचि पेश्याने इंजिनिअर आहेत. हे दोघेही एकत्र काम करतात. त्यांना नवीन संशोधन, विज्ञान आणि समाजसेवा या बाबींमध्ये आवड आहे. त्यामुळे त्यांनी अशा सामाजिक हिताचा संदेश देत अनोखा विवाह केला आहे.


आमच्या लग्नाला आलेल्या 1000 लोकांपैकी 10 लोकांना जरी आमचा संदेश समजला आणि ते तसे वागले तर याचा आम्हाला खूप आनंद आहे. असं श्रवणने म्हटलं आहे.


तर लग्नासारखा सोहळा हा कोर्टात किंवा मंदिरात होणं महत्त्वाचं आहे. तेव्हा हा समाज बदलेल. असे विचार रूचिने मांडले आहेत.


ग्लोबल वॉर्मिंगमुळे निर्माण होणाऱ्या अडचणी थांबवण्यासाठी लग्नात डोक्यावर अक्षता पडल्या-पडल्या नव वर-वधूने वृक्षलागवड केली. लग्नात रिटर्न गिफ्ट म्हणून झाडं दिली. लग्नाच्या शेवटी त्यांनी सरकारी शाळांमध्ये उपहार आणि विद्यार्थ्यांना आर्थिक मदत केली. लग्नात DJ वाजवण्याऐवजी सांसकृतिक नृत्य सादर केलं. संपूर्ण लग्नात या जोडप्यांनी प्लास्टिकचा वापर टाळला आहे.