

काही दिवसांपासून देशामध्ये फानी चक्रीवादळाने थैमान घातलं आहे. त्यात ओडिशा, आंध्र प्रदेश अशा अनेक राज्यांमध्ये शहरांचं मोठं नुकसान झालं आहे. चक्रीवादळामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.


भुवनेश्वर रेल्वे स्टेशनजवळ झाडं पडली आणि विजेचे खांबही मोडून पडले. हे वादळ ओसरेपर्यंत लोकांना रेल्वेस्टेशनच्या परिसरात जायला मनाई करण्यात आली आहे.


भुवनेश्वर रेल्वे स्टेशनच्य प्लॅटफॉर्म नंबर 1 चं छप्पर पूर्णपणे उडून गेलं. काही ठिकाणी बस आणि क्रेन उलटण्याच्याही घटना घडल्या. फानी वादळाच्या बचावकार्यासाठी NDRF ची पथकं ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहेत. रेल्वे प्रशासन ढिगारे हटवण्याचं काम करतं आहे.


वादळी वाऱ्यामुळे रस्त्यावरील झाडं कोसळली आहेत. काही झाडं घरांवर पडल्यामुळे मोठं आर्थिक नुकसान झालं आहे.


रस्त्यांच्या मधे झाडं पडल्यामुळे वाहतुकीचे मार्ग बंद झाले आहेत. तर रस्त्यांवरील बोर्डदेखील रस्त्यावर कोसळले आहेत.


गावागावत सगळीकडे उद्ध्वस्त झालेलं चित्र पाहायला मिळतं. यामुळे नागरिकांचं जनजीवन विस्कळीत झालं आहे.