लहान मुलांमध्ये बळावणाऱ्या मायोपिया आजार नेमका कसा होतो? दृष्टी जाण्याचीही भीती
तज्ज्ञांच्यामते कोरोना काळामध्ये (Corona) मोठ्यांप्रमाणे लहान मुलांच्या डोळ्यांची निगा राखायला हवी. वेळीच लक्ष न दिल्यास नजरेवर परिणाम (Effect on Eye site) होऊ शकतो.
कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मायोपिया नावाचा आजार आता समोर आलेला आहे. एका रिपोर्टनुसार चीन आणि नेदरलँड सारख्या देशांमध्ये डोळ्यांमधील मायोपियाची तक्रार वाढलेली आहे. भारतामध्ये देखील मायोपिया सारखीच लक्षणं असणारा आजार दिसून आलेला आहे.
2/ 9
तज्ज्ञांच्यामते कोरोना काळामध्ये मोठ्यांप्रमाणे लहान मुलांच्या डोळ्यांची निगा राखायला हवी. वेळीच लक्ष न दिल्यास नजरेवर परिणाम होऊ शकतो.
3/ 9
ऑनलाईन मीटिंग, शाळेसाठी मोबाईल आणि कम्प्युटरचा वापर जास्त होत आहे.सतत एकाच गोष्टीवर लक्ष केंद्रित करुन पाहत राहिल्यामुळे मायोपियाचा त्रास होतो.
4/ 9
हळूहळू नजर कमजोर होत जाऊन दूरची दृष्टी कमी होते. डोळ्यामधून रक्त येणं किंवा आंधळेपणा असे त्रास देखील होऊ शकतात.
5/ 9
शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन अभ्यासाकरता मोबाईल,लॅपटॉप किंवा कम्प्युटरचा वापर केला जातोय. याशिवाय मुलं घरामध्येच अडकलेली असल्यामुळे इंनडोअर ऍक्टिव्हिटी वाढलेल्या आहेत.
6/ 9
त्याकरता देखील मुलं इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसचा वापर करतात. सतत एका ठिकाणी नजर ठेवून पाहिल्यामुळे मायोपिया व्हायला लागलेला आहे.
7/ 9
डोळे सुकणं, डोळ्यांमध्ये सूज येणं, अस्पष्ट दिसणं, डोळे दुखणं, दूरच्या वस्तू अस्पष्ट दिसणं, झोप न लागणं. ही मायोपियाची काही लक्षणं आहेत.
8/ 9
इलेक्ट्रॉनिक डिव्हाईसच्या जास्त वापरामुळे डोळ्यांवर खुप वाईट परिणाम होतात. मोबाईल फोन,टीव्ही,कम्प्युटर,लॅपटॉप यासारख्या उपकरणांमधून निघणाऱ्या ब्लू लाईट डोळ्यांवरती परिणाम करतात.
9/ 9
बरीच मुलं संध्याकाळी किंवा रात्री झोपण्याआधी फोन वापरतात. अशा मुलांच्या डोळ्यांच्या तक्रारी वाढलेल्या आहेत स्लीप डिसऑर्डर बरोबरच दृष्टीही कमजोर होती आहे.