Home » photogallery » news » COVID 19 AUSTRALIA WOMEN SCIENTIST READY TO INFECTED TO HELP RESEARCHERS FIND VACCINE MHAK
COVID-19: ‘लशी’साठी जीव धोक्यात घालण्यास तयार, 22 वर्षांच्या तरुण शास्रज्ञाने स्वीकारलं चॅलेंज
अशी लस आली तर त्याचा जगाला फायदा होणार आहे. त्यामुळे सगळ्या मानवतेच भलं होणार असल्याचं तिचं मत आहे.
|
1/ 7
मेलबर्न – कोरोनावर लस शोधण्यासाठी जगभर संशोधन सुरु आहे. यात अनेक कंपन्यांनी आघाडी घेतली आहे. तर आता लशीचा प्रयोग आपल्यावर करा यासाठी कोरोना संक्रमित व्हायला ऑस्ट्रेलियातल्या एका तरुण महिला शास्रज्ञाने तयारी दाखवली आहे.
2/ 7
या महिला शास्रज्ञाचं नाव सोफी असं असून ती ब्रिसबेनला राहते. डेली ‘मेल ने’याबाबतचं वृत्त दिलं आहे. सोफीच्या नावाची चर्चा सोशल मीडियावरही सुरु झालीय.
3/ 7
कोरोनाच्या लशीचा प्रयोग करण्यासाठी डोनर तयार व्हावेत यासाठी सोफीने 1DaySooner हे कॅम्पेन सुरु केलं आहे.
4/ 7
जगभर कोरोनामुळे काही लाख लोकांचा मृत्यू झालाय झालाय. त्यावर औषध येणं गरजेचं आहे. त्यामुळे आपण संक्रमित व्हायला तयार असल्याचं तिने सांगितलं आहे.
5/ 7
अशी लस आली तर त्याचा जगाला फायदा होणार आहे. त्यामुळे सगळ्या मानवतेच भलं होणार असल्याचं तिचं मत आहे.
6/ 7
रशियाने जगातली पहिली लस शोधल्याचा दावा केला असला तरी त्यावर अजुन फारसा विश्वास ठेवला जात नाही.
7/ 7
तर ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीने केलेल्या संशोधनाबद्दल जगभर उत्सुकता असून त्या औषधाचे पहिल्या आणि दुसऱ्या चाचणीचे परिणामही चांगले आले आहेत.