भारतात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाउनची परिस्थिती आहे. नेहमी गजबजलेली शहरं ओस पडल्यासारखी दिसत आहेत. गुजरातमधील अमरेली इथं एका जोडप्यानं बंद असलेल्या बाजारात प्री वेडिंग शूट केलं आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर त्यांनी मास्कही घातले आहेत. बाजारपेठा बंद असलेल्या बॅकग्राउंडवर जोडप्यानं प्री वेडिंग शूट केलं आहे. त्यांनी कोरोना व्हायरसचं गांभीर्यही लोकांच्या लक्षात आणून दिलं आहे. प्री वेडिंग शूट करत असताना खबरदारी घेत दोघांनीही मास्क लावले आहेत. त्यांचे हे फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. जगभरात कोरोनामुळे आतापर्यंत 11 हजारांहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे. याशिवाय अजुनही अनेक देशांत रुग्णांची संख्या वाढतच चालली आहे.