आत्ताच सोडा या सवयी नाहीतर तुम्हालाही होऊ शकतो कोरोना
रोजच्या जीवनातील अशा काही सवयी आहेत ज्यामुळे सध्या कोरोना व्हायरस पसरण्याच्या खूप शक्यता आहेत.
|
1/ 9
कोरोना व्हायरसनं सध्या देशात थैमान घातलं आहे. या व्हायरसच्या संक्रममापासून वाचण्यासाठी स्वच्छता राखण्याचं आणि स्वतःची काळजी घेण्याचं आवाहन सरकार कडून करण्यात येत आहे.
2/ 9
पण रोजच्या जीवनात अशा काही सवयी आपल्याला असतात. ज्यामुळे सध्या आपल्याला कोरोना व्हायरस होण्याच्या खूप शक्यता आहेत.
3/ 9
नखं चावणं- डेंटिस्टनुसार, आपल्या नखांमध्ये अनेकदा बरेच किटाणू राहू शकतात. त्यामुळे न धुता जर आपण हात तोंडात घातले. तर हे बॅक्टेरिया तोंडावाटे आपल्या शरीरात जातात. त्यामुळे जर तुम्हाला नखं चावण्याची सवय असेल तर ती आत्ताच सोडा.
4/ 9
बेडशीट आणि कपडे वेळच्या वेळी न धुणे- जर तुम्ही बेडशीट 2 आठवड्यांनी एकदा धुवत असाल तर ही सवय बदला. सध्या कोरोना व्हायरसचं संक्रमण लक्षात घेता तुम्ही आठवड्यातून किमान 2 वेळा बेडशीट धुणं गरजेच आहे.
5/ 9
खाणं शेअर करणं- अनेकदा आपण घरी किंवा फ्रेंड्ससोबत असताना खाणं शेअर करतो. पण सध्याच्या परिस्थितीत असं करण घातक ठरु शकतं.
6/ 9
सतत केसांना हात लावणे - जर तुम्हाला सतत केसांना हात लावण्याची किंवा केस बोटांभोवती गुंडाळण्याची सवय असेल तर ही सवय सोडा. केसांमधील बॅक्टेरीया हातांमार्फत तुमच्या शरीरात जाऊ शकतात.
7/ 9
पिंपल्स फोडणे- जर तुम्हाला पिंपल्सची समस्या असेल तर त्यांना फोडू नका. सध्या पार्लरला जाणं शक्य नाही पण तुम्ही घरी उपचार करायला जाऊ नका. चेहऱ्याला सतत स्पर्श करणं कोरोनाच्या दृष्टीनं महागात पडू शकतं.
8/ 9
बोटांनी दात साफ करणे- अनेकदा काही खात असताना आपल्या दातात काही ना काही अडकून राहतं. अनेकांना हे बोटांनी साफ करण्याची सवय असते. पण ही सवय वेळीच सोडा. कारण यामुळे बॅक्टेरियाचं इन्फेशन होऊ शकतं.
9/ 9
बेसीनवर किंवा बाथरुममध्ये टुथब्रश ठेऊ नका- सध्याच्या काळात स्वतःची स्वच्छता राखणं अतिशय गरजेच आहे. पण ब्रश केल्यानंतर तो बेसीनवर किंवा बाथरुममध्ये ठेवण्याची सवयीमुळे तुम्हा आजारी पडू शकता. या ठीकाणी अनेकादा बॅक्टेरियांची वाढ होते. जे तोंडातून तुमच्या शरीरात जाऊ शकतात.