

सध्याच्या स्पर्धेच्या युगात ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी टेलिकॉम कंपन्यांमध्ये जबरदस्त रस्सीखेच सुरू असते. Cable.co.uk या संस्थेने केलेल्या संशोधनानुसार जगाचा विचार केला तर भारतामध्ये सर्वात स्वस्त मोबाइल डेटा मिळतो.


भारतातील एक जीबी मोबाइल डेटाची किंमत जगाच्या सरासरी 600 रूपये आहे. पण भारतात एक जीबी मोबाइल डेटा सरासरी 18.5 रू. (0.26 अमेरिकन डॉलर) आहे. त्यामुळे जगाच्या मानाने भारतात सर्वात स्वस्त डेटा मिळतो.


ब्रिटेनमध्ये एक जीबी डेटाची किंमत 6.66 डॉलर(468रू.) तर अमेरिकेत 12.37 डॉलर इतकी किंमत आहे. तर जगातील सर्व देशातील डेटाची किंमत 8.53 डॉलर म्हणजे 600 रूपये इतकी आहे.


जगात सर्वात स्वस्त मिळणाऱ्या देशामध्ये भारताचा पहिला क्रमांक आहे. भारतानंतर किर्गिस्तान (0.27डॉलर), कजाकस्तान ( 0.49 डॉलर), यूक्रेन (0.51डॉलर) आणि खांडा (0.56 डॉलर) या देशांमध्ये सर्वात स्वस्त डेटा मिळतो.


युरोपीय संघातील फिनलॅंड,पोलंड,डेन्मार्क,इटली,ऑस्ट्रिया आणि फ्रान्स हे देश जेवढे पैसे डेटासाठी खर्च करतात, हा खर्च ब्रिटनच्या खर्चाच्या 0.1 इतका आहे.


संशोधनातून हेही समोर आले आहे की, ब्रिटनच्या तुलनेत पश्चिम यूरोपातील 15 देशांतील मिळणाऱ्या किंमतीपेक्षा स्वस्त आहे.