

प्रियांका चोप्राने गुरुवारी कान चित्रपट महोत्सवात दणक्यात पदार्पण केलं. फ्रेंच रिवेरा येथे रेड कार्पेटवर चालल्यानंतर प्रियांका चोप्रा पांढऱ्या रंगाच्या आउटफिटमध्ये दिसली. तिचे या लुकमधील फोटो कमालीचे व्हायरल झाले होते. तिचा हा लुक लेडी डायना यांच्या लुकशी प्रेरीत होता.


कान महोत्सवात जाण्यापूर्वी प्रियांकाने आयकॉनिक पर्सनॅलिटींचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. यात लेडी डायना यांच्या फोटोचाही समावेश होता. प्रियांकाने घातलेला पांढरा गाउन आणि लेडी डायना यांचा फोटोतला गाउन याच्यात बरंच साम्य आहे.


लेडी डायना यांच्या फोटोशिवाय प्रियांकाने सोफिया लॉरेन, प्रिन्सेस मोनाको, ग्रेस कॅली यांचे फोटोही शेअर केले होते. यामुळेच प्रियांकाचे पुढचे लुक हे या व्यक्तिंच्या पेहरावाशी साधर्म्य साधणारे असतील असं म्हटलं जात आहे.


प्रिन्सेस डायना या वयाच्या २६ व्या वर्षी प्रिन्स चार्ल्स यांच्यासोबत पहिल्यांदा कान महोत्सवात आल्या होत्या. यावेळी त्यांनी कॅथरीन वॉकरचा डिझायनर गाउन घातला होता.


कान महोत्सवात प्रियांकाने धमाकेदार पदार्पण केलं. यावेळी प्रियांकाने शिमरी ब्लॅक आणि मरून रंगाचा थाय हाय स्लिट गाउन घातला होता. प्रियांकाने तिच्या लुकसोबत फार प्रयोग न करता साधेपणाने महोत्सवात जाण्याला प्राधान्य दिलं.


मोकळे केस, गुलाबी लिपस्टिक आणि न्यूड मेकअपमध्ये प्रियांका फार सुंदर दिसत होती. कानआधी प्रियांका पती निक जोनससोबत मेट गालामध्ये गेली होती. मेट गालामधील तिचा लुक फार वेगळा होता.