

बॉलिवूडची हॉट अभिनेत्री मलायका अरोरा आणि अभिनेता अर्जुन कपूर यांच्यातलं नातं आता लोकांपासून लपून राहिलेलं नाही. यावर्षी दोघं लग्न बंधनात अडकणार असल्याचं म्हटलं जात आहे.


नुकतंच दोघांना मुंबईतील एका रेस्तराँमधून बाहेर येताना पाहण्यात आलं. विशेष म्हणजे यावेळी ते दोघंच नव्हती तर मलायका आणि अरबाजचा मुलगा अरहानही त्यांच्यासोबत होता.


तिघांचे लंच डेटवरचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. त्यांच्यासोबत अरहानला पाहण्यात आल्यामुळे मुलाचीही आईच्या या नात्याला संमती असल्याचं दिसून येतंय. त्यामुळे या वर्षात मलायका आणि अर्जुनने लग्न केलं तर आश्चर्य वाटणार नाही.


मलायका अनेकदा आपल्या मुलासोबत अरहानसोबत फिरताना दिसते. अर्जुनसोबतच्या या लंच डेटलाही ती अरहानला घेऊन आली होती. यावेळी तिने निळ्या रंगाची जीन्स आणि पांढऱ्या रंगाचं शर्ट घातलं होतं.


यावेळी अरहान आणि अर्जुनही अगदी साध्या कपड्यांमध्ये दिसले. अरहानने काळ्या रंगाची जीन्स आणि निळ्या रंगाचं शर्ट घातलं होतं.