Hema Malini Net Worth: बॉलिवूडची ड्रीम गर्ल म्हणून ओळखल्या जाणाऱ्या अभिनेत्री हेमा मालिनी अशा अभिनेत्रींपैकी एक आहे ज्यांनी आपल्या जबरदस्त अभिनय आणि सौंदर्याच्या जोरावर अनेक दशके इंडस्ट्रीवर राज्य केले. 60 च्या दशकात त्यांनी आपला पहिला चित्रपट केला होता. हेमा मालिनी 'शिमला मिर्च' सिनेमामध्ये शेवटच्या दिसल्या होता, ज्यात रकुलप्रीत सिंह आणि राजकुमार राव मुख्य भूमिकेत दिसले होते. हा चित्रपट 2020 मध्ये प्रदर्शित झाला होता.
बॉलिवूडमधील सर्वात यशस्वी, सुंदर आणि प्रसिद्ध अभिनेत्रींपैकी हेमा मालिनी या एक आहेत. जेव्हा त्यांनी बॉलिवूडमध्ये पाऊल ठेवले तेव्हापासून ते आजपर्यंच सर्वांनाच या ड्रीम गर्ल भुरळ घातली आहे. केवळ प्रेक्षकांमध्ये नव्हे तर बॉलिवूडमधील अनेक सुपरस्टार्स देखील त्याकाळात हेमा मालिनी यांच्यासोबत संसार थाटण्याचं स्वप्न पाहतं होते. त्यामुळचं तर त्यांना 'ड्रीम गर्ल' या नावानं ओळखलं जातं.
हेमा मालिनी यांनी 1968 मध्ये 'सपनों का सौदागर' या चित्रपटातून आपल्या फिल्मी करिअरची सुरुवात केली होती. हेमा मालिनी यांनी धर्मेंद्र यांच्यासोबत एकापाठोपाठ एक अनेक चित्रपट केले आणि 1980 मध्ये त्यांच्याशी लग्न केले. पण, आज आम्ही तुम्हाला हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांच्या लव्हस्टोरीबद्दल किंवा त्यांच्या फिल्मी करिअरबद्दल सांगणार नाही तर त्यांच्या एकूण संपत्तीबद्दल सांगणार आहोत. तुम्हाला हे जाणून आश्चर्य वाटेल की हेमा मालिनी संपत्तीच्या बाबतीत पती धर्मेंद्र आणि मुलगा सनी देओल यांना चांगलीच टक्कर देतात.
यापैकी 114 कोटी रुपये त्यांचे आणि 135 कोटी रुपये त्यांचे पती धर्मेंद्र यांचे आहेत. गेल्या काही वर्षांत हेमा यांच्या संपत्तीत सुमारे 72 कोटींची वाढ झाली आहे. कारण, 2014 मध्ये त्यांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांच्याकडे 178 कोटी रुपयांची संपत्ती होती, त्यामध्ये पती धर्मेंद्र यांच्या संपत्तीचा देखील समावेश होता.