

बॉलिवूडमध्ये नेहमीच कोणाना कोणाच्या अफेअरच्या चर्चा होत असतात. सध्या चॉकलेट बॉय रणबीर आणि आलिया यांच्याशिवाय अजून एक जोडपं चर्चेत आहेत. हे कपल म्हणजे हर्षवर्धन राणे आणि किम शर्मा.


नुकतेच या दोघांना एकत्र स्कुटीवर फेरफटका मारताना पाहण्यात आले. कदाचित दोघं गोव्यात स्कुटीवरून फिरत असतील असं तुम्हाला वाटेल. मात्र दोघं गोव्यात नाही तर मुंबईत स्कुटीवरून फिरत होती.


हर्षवर्धन आणि किम दोघांनीही त्यांच्या नात्याबद्दल अधिकृत घोषणा केलेली नाही. मात्र दरदिवशी त्यांचे नवनवीन फोटो चाहत्यांना पाहायला मिळत आहेत.


गेल्या काही दिवसांपासून ते सतत प्रसारमाध्यमांसमोर हातात हात घालून येत आहेत. २१ ऑक्टोबरलाही दोघांना एकत्र पाहण्यात आले होते.


बॉलिवूडपेक्षा किमची वेगळी ओळख सांगायची झाली तर, क्रिकेटपटू युवराज सिंगला ती काही वर्ष डेट करत होती. मात्र त्यांचं हे नातं लग्नापर्यंत गेलं नाही.