भाजपचे विधान परिषदेचे आमदार प्रसाद लाड यांच्या गाडीचा मुंबई पुणे एक्स्प्रेस हायवे वर भीषण अपघाता झाला असल्याची माहिती देण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कामशेत बोगद्यानंतर टोल नाक्याच्या आधी एक किलोमीटर हा अपघात झाला आहे. या अपघातामध्ये गाडीचं नुकसान झालं असल्याचं सांगण्यात आलं आहे. आमदार प्रसाद लाड हे सुखरुप असून त्यांना अपघातामध्ये कोणतीही इजा झाली नाही अशी माहिती सूत्रांकडून देण्यात आली आहे. तर अपघात झाल्यानंतर लाड हे सुखरूप असून ते नगरच्या दिशेने रवाना झाले आहेत.