पाटना, 7 ऑगस्ट : सध्या बिहारमधील एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एका मंदिराचे पुजारी महिलेला कानशिलात लगावताना दिसत आहेत. ही महिला दर्शनासाठी आल्याचं सांगितलं जात आहे. मिळालेल्या माहितीनुसार हा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मंदिर समितीने पुजारीविरोधात कारवाई केली आहे. व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर लोक विविध प्रकारच्या प्रतिक्रिया देत आहे. सार्वजनिक स्वरुपात महिलेला मारहाण करणं योग्य नसल्याचं अनेकांनी म्हटलं आहे.