

केंद्र सरकारने मोठा निर्णय घेत संरक्षण कर्मचाऱ्यांना (Defense Employees) मोठा दिलासा दिला आहे. सरकारकडून 1 ऑक्टोबर 2019 पासून वाढलेल्या पेन्शनसाठीची (Enhanced Ordinary family Pension- EOFP) किमान सेवेची अनिवार्यता संपली आहे. याबाबतची माहिती संरक्षण मंत्रालयाकडून (Defense Ministry ) देण्यात आली आहे.


डिफेन्स कर्मचाऱ्यांच्या कुटुंबाला EOFP साठी सलग 7 वर्ष सर्व्हिस करण्याचा नियम होता. परंतु आता हा नियम संपुष्ठात आणण्यात आला आहे. वाढलेली Enhanced Ordinary family Pension- EOFP डिफेन्स कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 50 टक्के आहे. तर Ordinary Family Pension (OFP) कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 30 टक्के असते.


मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, EOFP डिफेन्स कर्मचाऱ्यांच्या पगाराच्या 50 टक्के असते आणि सर्व्हिसदरम्यान कर्मचाऱ्याचं निधन झाल्यास, त्या तारखेपासून 10 वर्षांसाठी दिली जाते. सलग 7 वर्ष सर्व्हिसची अनिवार्यता समाप्त करण्याचा अवधी 1 ऑक्टोबर 2019 पासून लागू होईल.


नोकरी सोडल्यानंतर (Release), रिटारमेंटनंतर (retirement) कर्मचाऱ्याचं निधन झाल्यास, त्याच्या निधनाच्या तारखेपासून 7 वर्षांपर्यंत किंवा कर्मचारी 67 वर्षांचा होईपर्यंत EOFP दिली जाते.