

सध्या लग्नाचे कार्यक्रम म्हटलं की सगळ्यात महत्त्वाचे असतात ते म्हणजे फोटो. त्याता आता बॉलिवूडमध्ये सगळ्यात पॉप्यूलर जोडप्यांच्या लग्नाच्या चर्चा सुरू आहेत. त्यांचे फोटो सोशल मीडियावर चांगलेच गाजत आहे. अशात सेलिब्रेटींसारखं फोटो शूट करावं असं प्रत्येकाला वाटत असतं. त्यामुळे जाणून घेऊयात अशी ठिकाण जिथे तुम्ही भन्नाट फोटो शूट करू शकता.


मंडळी, सध्या प्री-वेडिंग शूटचा जमाना आहे. तुम्हालाही तुमचं वेडिंग शूट दणक्यात करायचं असेल तर या खालील ठिकाणी नक्की जा.


प्री-वेडिंग शूट म्हटलं तर सगळ्यात आधी नाव हे राजस्थान शहराचं येतं. राजस्थानमध्ये अतिशय सुंदर अशा हवेल्या, मैलांवर पसरलेला वाळवंट, मीनारे आणि सगळ्यात आकर्षक म्हणजे त्यांचा शाही थाट. या सगळ्यामुळे तुमचं वेडिंग शूट एकदम हिट होणार.


दुसरं शहर म्हणजे राजधानी दिल्ली. दिल्लीमध्ये काही असे पॅलेस आहेत जिथे तुम्ही अगदी शाही वेडिंग शूट करू शकता. इथे अग्रसेन की बावली, हुमायूँ मकबरा, हौज खास विलेजमधलं डियर पार्क आणि पुराना किला शूटसाठी सगळ्यात भारी जागा आहे.


हो आता तुम्हाला जर रोमँटिक फोटो शूट करायचं असेल तर तुम्ही 'दिलवाले दुल्हनियां ले जाएंगे'मधील शाहरुख आणि काजोलसारखं पंजाबमध्ये जा. पंजाबमधील त्या मोहरीच्या शेतात बंजाबी सलवार आणि कुर्ता घालून तुम्ही फोटो शूट करा. तुमच्या आनंदाला चार चाँद लागतील यात काही शंकाच नाही.