लोकसभेच्या 2019 च्या आखाड्यात राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा आणि राजकारणातल्या 'चाणक्य नीती'साठी ओळखले जाणारे शरद पवार उतरणार आहेत.
2/ 7
पवारांनी आपली प्रतिज्ञा मोडून पुन्हा निवडणुकीच्या आखाड्यात कार्यकर्त्यांच्या 'आग्रहा'खातर उडी घेतली. त्यामुळे राज्याच्या राजकारणातली रंगत आणखी वाढणार आहे.
3/ 7
2014 च्या निवडणुकीआधी शरद पवारांनी यापुढे निवडणुक लढणार नाही. नव्या दमाच्या लोकांना संधी देणार अशी घोषणा केली होती. त्यानंतर पवारांनी ज्येष्ठांच्या म्हणजेच राज्यसभेत जाणं पसंत केलं. पण गेल्या पाच वर्षात भीमा आणि मुठेतून बरच पाणी वाहून गेल्याने राजकीय समिकरणही बदलली आहेत.
4/ 7
माढा हा राष्ट्रवादीचा गढ. माढात सोलापूर जिल्ह्यातले 4 आणि सातारा जिल्ह्यातले 2 मतदारसंघ येतात. महाराष्ट्रात मंत्री असताना पवार सोलापूर जिल्ह्याचे 10 वर्ष संपर्कमंत्री होते त्यामुळे पवारांना मानणारा मोठा वर्ग सोलापूर जिल्ह्यात आहे.
5/ 7
करमाळा, माढा, सांगलो,माळशीरस,फलटण आणि माण हे सहा विधानसभा मतदारसंघ माढा लोकसभा मतदार संघात येतात.
6/ 7
सातारा जिल्ह्यात निंबाळकर, फलटणकर आणि भोसले ही सर्वच घराणी पवारांना मानणारी आहेत. राष्ट्रवादीचे विजयसिंह मोहिती पाटील हे सध्या माढाचं प्रतिनिधित्व करतात.
7/ 7
शरद पवार लोकसभेसाठी माढ्यातून उभे राहिले तर त्याचा सोलापूर, सातारा, उस्मानाबाद आणि सातारा या जिल्ह्यात राष्ट्रवादीला फायदा होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.