

इथोपिया येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. येथे Ark of convenant म्हणजेच पवित्र संदूक वाचविण्यासाठी शेकडो लोकांचा मृत्यू झाला आहे. ही आर्क इथोपियातील तिगरे भागातील सेंट मेरी चर्चमध्ये सुरक्षा कर्मचाऱ्यांच्या उपस्थित सुरक्षित असतो आणि ख्रिश्चन धर्मात याला पवित्र मानलं जातं. मिळालेल्या माहितीनुसार तब्बल 800 लोकांना सेंट मेरी चर्चच्या जवळपास मारण्यात आलं आहे आणि अनेक दिवस यांचे मृतदेह रस्त्यावर पडून होते.


गेटू माक नावाच्या एका विद्यापीठातील प्राध्यापकाने सांगितलं की, जेव्हा लोकांनी बंदुकीचा आवाज ऐकला तेव्हा ते चर्चच्या दिशेने पळू लागले. पवित्र संदुकाची रक्षा करणाऱ्या पादरींना मदत करण्याच्या हेतूने हे लोक धावत होते. यामध्ये अनेकांचा मृत्यू झाला.


ही घटना नोव्हेंबर महिन्यात घडली होती. मात्र त्यावेळी इथोपियाचे पीएम अहमद यांनी इंटरनेट आणि मोबाइल नेटवर्कच्या सेवा बंद केल्या होत्या. त्यामुळे येथील लोकांना जगाशी संपर्क तुटला होता. मात्र आता तेथील परिस्थिती हळूहळू सुधारत आहे. माक यांचं म्हणणं आहे की, नोव्हेंबर महिन्यात येथील लोकांमध्ये संदूक दुसऱ्या शहरात घेऊन जाणार याबद्दल भीती निर्माण झाली होती. काहींना तर वाटलं की, हे संदूक नष्ट केलं जाईल. ते पुढे म्हणाले की, लुटण्यासाठी येणाऱ्या आरोपींनी घटनास्थळी बंदुकीने गोळीबार केला व लोकांना मारलं.


अहमद हे सत्तेवर येण्यापूर्वी इथोपियावर 27 वर्षांपर्यंत तिगरे पीपल्स लिबरेशन आर्मीने शासन केलं होतं. तिगरे भागातील लोकसंख्या संपूर्ण देशाच्या लोकसंख्येच्या अवघ्या 6 टक्के होती. मात्र त्या भागातील लोकांच्या शक्तीचा देशाच्या राजकारणावर वर्चस्व राहिला आहे. त्यांच्या कार्यकाळात मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार आणि मानवाधिकारांचं उल्लंघनाच्या घटना झाल्या होत्या. यामुळे तिगरी पीपल्स लिबरेशन फ्रंटच्या सरकारबाबत चांगले जनमत नव्हते. आणि 2018 मध्ये अहमद सत्तेत आले.


इथोपियाचे पंतप्रधान अबिय अहमद यांनी तिगरे क्षेत्रात झालेल्या हल्ल्यानंतर सैन्याला कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. पंतप्रधानांनी सैन्याला दिलेल्या आदेशानंतर तिगरे क्षेत्रात मुख्य राजकीय पक्षाने तेथील सुरक्षा दलांना सैन्याच्या उत्तर कमांड चौकीवर कब्जा करण्याचा आदेश दिला होता. स्थानिक सुरक्षा दलांनी तेथे लष्कराची शस्त्रास्त्रे, उपकरणे ताब्यात घेतली आणि तेथे तैनात असलेल्या सैनिकांना बंदी बनवलं. तेव्हापासून या परिसरात यादवी युद्धाची स्थिती निर्माण झाली आहे.