रुपाली बरुआ आशिष विद्यार्थी यांच्यापेक्षा वयाने खूपच लहान आहे, ती 33 वर्षांची आहे. यासोबतच दोघांच्या संपत्तीच्या आकड्यातही बराच फरक आहे. रिपोर्टनुसार, रुपाली बरुआची एकूण संपत्ती सुमारे 1 मिलियन डॉलर्स म्हणजेच 8 कोटी रुपये आहे. रुपाली तिच्या मॉडेलिंग असाइनमेंट्स, ब्रँड एंडोर्समेंट्स आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून कमाई करते. ती एक प्रसिद्ध सोशल मीडिया एन्फ्लुएन्सरदेखील आहे.
बॉलिवूडमध्ये नकारात्मक भूमिका साकारण्यासाठी प्रसिद्ध असलेले आशिष विद्यार्थी यांचा जन्म 19 जून 1962 रोजी दिल्लीत झाला. 1986 पासून त्यांनी अभिनय कारकिर्दीला सुरुवात केली. आशिष विद्यार्थी यांनी अनेक हिंदी, तेलुगू, तमीळ, कन्नड, मल्याळम, इंग्रजी, ओडिया, मराठी आणि बंगाली चित्रपटांमध्ये काम केलंय. अलीकडेच ते अमिताभ बच्चन आणि रश्मिका मंधाना स्टारर चित्रपट 'गुडबाय'मध्ये दिसले होते. ते सोशल मीडियावरही खूप सक्रिय आहेत व फूड ब्लॉगिंगदेखील करतात.