अभिनेत्री अनिता हसनंदानीने नुकतेच बेबी बम्पसोबत अत्यंत बोल्ड फोटोशूट केल॓ आहे. तिने यातील एक फोटो इन्स्टाग्रावर शेअर केला आहे. यामध्ये अनिता आणि तिचा पती रोहित रेड्डी सेक्सी पोझ देताना दिसत आहे. हा फोटो सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होताना दिसत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @anitahassanandani)
अनिताने ऑक्टोबरमध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या प्रेग्नन्सीची घोषणा केली होती. 39 वर्षीय अभिनेत्री अनिता आणि तिचा नवरा रोहित रेड्डी यांनी एक व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये त्यांच्या लग्नाचे आणि एन्गेजमेंटचे काही फोटोज आहेत. यातील एका फोटोत रोहित अनिताच्या बेबी बंम्पला किस करताना दिसत आहे. (फोटो सौजन्य- इन्स्टाग्राम @anitahassanandani)