आजीच्या आठवणीत अनन्या पांडे झाली भावूक; शेअर केले बालपणीचे फोटो
अभिनेता चंकी पांडेची आई आणि अनन्या पांडेची आजी स्नेहलता पांडे यांचं शनिवारी मुंबईत निधन झालं. अनन्याने आजीच्या आठवणीत काही फोटो शेअर केले आहेत.
|
1/ 8
बॉलीवूड अभिनेता चंकी पांडेची स्नेहलता पांडे यांचं शनिवार 10 जुलै 2021ला निधन झालं. यामुळे संपूर्ण पांडे कुटुंबावर शोककळा पसरली आहे. चंकी पांडेची मुलगी अभिनेत्री अनन्या पांडेने आपल्या आजीसोबतचे बालपणीचे फोटो शेअर केले आहेत. पाहा तिचे फोटो.
2/ 8
अनन्या पांडेने पोस्ट मध्ये लिहिलं आहे, 'आजी तु इतकी गोड होतीस की तुला कधीच विसरू शकत नाही. माझं तुझ्यावर खूप प्रेम आहे.'
3/ 8
अनन्या तिच्या आजीच्या निधनावेळी घरी नव्हती तर ती कामनिमित्त बाहेर होती. पण अंत्यसंस्कारासाठी ती पोहोचली होती.
4/ 8
आजीच्या निधनानंतर अनन्या फारच दुःखी अवस्थेत अत्यंसंस्काराच्या ठिकाणी पोहोचली होती.
5/ 8
अनन्या आणि तिच्या इतर चुलत भांवडासह तिची आजी स्नेहलता दिसत आहेत.
6/ 8
स्नेहलता या चित्रपटसृष्टीत नव्हत्या. तर काही दिवसांपासून त्या आजारी होत्या.
7/ 8
अनन्या आपल्या आजीसोबत मस्ती करत फोटो आणि व्हिडीओही शेअर करायची.
8/ 8
मुंबईत बांद्रा येशील स्मशानभूमीत त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यावेळी अनन्या आणि संपूर्ण पांडे कुटुंबिय उपस्थित होते.