

शुक्रवारी अमृतसर जवळ झालेल्या रावण दहन कार्यक्रमात झालेल्या भीषण रेल्वे अपघाताबाबत आता ड्रायव्हरनं खुलासा केलाय. जोडा फाटक जवळ ट्रॅकवर गर्दी दिसली. त्यानंतर ट्रेनचा वेगही कमी केला. मात्र हजारो प्रवाशांच्या सुरक्षेसाठी गाडी पुढे न्यावी लागली असं त्यानं सांगितंय.


त्या गाडीचा ड्रायव्हर अरविंद कुमार याने रेल्वे प्रशासनाला पत्र लिहून त्या दिवशी नेमकं काय झालं याचा खुलासा केलाय. गाडीचा वेग काय होता, ट्रॅकवर लोकं होती का? सिग्नल मिळाला का? अशा अनेक गोष्टी त्यानं या पत्रात सांगितल्या आहेत.


ग्रीन सिग्नल असल्यामुळेच मी गाडी पुढे नेत होतो. त्यामुळं गाडीचा वेग जेवढा पाहिजे तेवढा होता. जोडा फाटकजवळ आल्यावर डबल येलो सिग्नल मिळला.


डबल येलो सिग्नलचा अर्थ गाडीचा वेग कमी करा असता होतो. त्यामुळं मी गाडीचा वेग कमी करण्यासाठी ट्रेनचा इमर्जन्सी ब्रेक दाबला.


ट्रेनचा इमर्जन्सी ब्रेक दाबल्यावर गाडीचा वेग अतिशय कमी झाला. मात्र वेग कमी केल्यावर लोकांनी ट्रेनवर दगडांचा मारा सुरू केला.


लोकांनी दगडफेक सुरू केल्यावर ट्रेनमध्ये असलेल्या हजारो प्रवाशांची सुरक्षा महत्वाची होती. त्यामुळं मी ट्रेनचा वेग पुन्हा वाढवला.


ट्रेनचा वेग वाढवून मी ट्रेन अमृतसर स्थानकात आणली. ट्रेन सुरक्षीतपणे अमृतसर स्थानकात आल्यावर मी घटनेची माहिती वरिष्ठांना दिली.


शुक्रवारी अमृतसर जवळच्या जोरा फाटक इथं रावण दहनाचा कार्यक्रम सुरू असताना.गर्दी असल्यामुळं लोक कार्यक्रमस्थळाच्या बाजूला असलेल्या रेल्वे ट्रॅकवर उभे होते. अनेकजण व्हिडीओ आपल्या फोनवर शुटिंग करत होते. फटाक्यांच्या आवाज आणि फोनमध्ये गुंग झाल्याने ट्रेन येत असल्याचं त्यांना कळालेच नाही. त्यामुळं ट्रेन लोकांना चिरडून पुढे गेली. यात 61 जणांचा मृत्यू झाला होता.