

नासीर हुसेन : अमृतसरजवळच्या रेल्वे अपघाताने सर्व देश हादरून गेलाय. पठाणकोटहून येणाऱ्या ज्या ट्रेनने माणसांना चिरडलं त्या ट्रेनला सध्या पंजाबमधल्या दूरवरच्या 'अटारी' रेल्वे यार्डात ठेवण्यात आलंय. हे ठिकाण पाकिस्तानच्या सीमेपासून अगदी जवळ आहे. कधी काळी हाच ट्रॅक भारत आणि पाकिस्तानला जोडत होता. 71 वर्षानंतर पुन्हा तो ट्रॅक रक्तानं माखून गेलाय.


लोकांचा असलेला राग आणि भाषण घटनेची पार्श्वभूमी यामुळं या ट्रेनला दूरवर एकांतात ठेवण्यात आलंय. या ट्रेनचा एक भाग रक्तानं माखला आहे. रेल्वे इंजिन पासूनच्या काही बोगींवर रक्ताचे डाग लागले आहेत आणि खालच्या भागात मानवी अवयव अजुनही अडकले आहेत.


चौकशीचे सोपस्कार आणि लोकांचा राग लक्षात घेऊन ही ट्रेन जाणीवपूर्वक दूर ठेवण्यात आलीय. याच ट्र्रॅकवरून ऐकेकाळी भारतातून पाकिस्तानला ट्रेन जात होती. मात्र आता ती सेवा बंद आहे आणि ट्रॅकही खराब झालाय.


या ट्रेनच्या बोगीवर जालंधर असं लिहिलेलं आहे. ही ट्रेन दररोज जालंधर आणि अमृतसरच्या दरम्यान धावते. नोकरदार, खरेदीसाठी जाणारे व्यापारी या ट्रेनने नेहमी जात असतात. आता या गाडीला कायमचा डाग लागलाय.


पाकिस्तान सीमेला लागून हा भाग असल्यानं इथे कडक सुरक्षा व्यवस्था आहे. एका बाजूला मजबूत कुंपण तर दुसऱ्या बाजूला सरकारी इमारती आहेत. सुरक्षा तपासणीशिवाय सामान्य माणूस या ट्रॅकपर्यंत जावूच शकत नाही.


कायम लोकांच्या गर्दीनं गजबजलेली ही गाडी आता रिकामी झालीय. सुरक्षा रक्षकांशिवाय तिथे कुणीही नाही. रेल्वे सुरक्षा दलाचे जवान या गाडीच्या सुरक्षेसाठी तैनात करण्यात आले आहेत.


अटारीच्या या ट्रॅकला जंग लागलाय. कारण सध्या इथं ट्रेनची वाहतूकच नसते. या ट्रॅकने 1947 मध्ये भीषण अनुभ घेतला होता. फाळणीनंतर हत्या आणि जाळपोळ झाली. लाखो माणसांनी स्थलांतर केलं. त्यावेळी माणसांनी भरलेल्या गाड्या याच ट्रॅकवरून धावल्या होत्या.


घटनेची चौकशी सुरू असल्याने या ट्रेनची स्वच्छता अजून करण्यात आलेली नाही. अनेक डब्यांच्या खाली मानवी शररीराचे अवयव अडकले आहेत. डब्यांवर रक्ताचे डाग आहेत. खरं म्हणजे या गाडीचा त्यात काहीही दोष नाही. मात्र आज या गाडीची ओळख मृत्यूची ट्रेन अशी झालीय.


अमृतसरमध्ये विजयादशमीला रक्ताचे सडे पडले. पंजाब राज्यातल्या अमृतसरमध्ये रावणदहनाच्या कार्यक्रमात 61 जणांचा मृत्यू तर 51 जण जखमी झाले आहेत. रावणदहनाचा कार्यक्रम पाहण्यासाठी रेल्वे रुळावर उभ्या असलेल्या लोकांना भरधाव रेल्वेनं चिरडलं. यामध्ये अनेकांचा अक्षरश: चेंदामेंदा झाला.


याच रावण दहनाच्या कार्यक्रमात 32 वर्षांचा दलबीर जोडा हा रामलीला कार्यक्रमात रावणाची भूमिका साकारतो. रेल्वे अपघात होण्याच्या काही वेळे आधीच तो स्टेरवर उत्तम भूमिका सारल्यामुळे त्याचे पारितोषिक घेण्यासाठी गेला.


पारितोषिक घेऊन तो खाली आला आणि रेल्वेरुळ ओलांडून घरी चालला होता. पण त्याचवेळी रेल्वे अपघात झाला आणि त्यात दलबीरचा दुर्देवी मृत्यू झाला.


खरंतर दुरून येणाऱ्या रेल्वेला दलबीरने पाहिलं होतं. त्याने सगळ्यांना सावध करण्यासाठी आरडाओरड केली. काहींना आवाज गेला तर काहींना फटाक्यांच्या आतषबाजीमुळे आवाजच गेला नाही. काहींनी तर त्याच्या बोलण्याकेड दुर्लक्ष केलं.


लोकांना बाजुला करण्याच्या नादात दलबीर स्वत:ही रेल्वेखाली चिरडला गेला. या अपघातात त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.


दरबीरला 8 महिन्यांची एक मुलगी आहे. त्याच्या लग्नाला फक्त 1 वर्ष पूर्ण झालं आहे आणि त्यात त्याचं असं जाणं म्हणजे त्याच्या कुटुंबियांसाठी मोठा धक्का आहे.


रामलीलामध्ये रावणाचं काम आणि काही इतर लहान-सहान कामं करून दलबीर आपलं कुटुंब सांभाळत होता. पण आता त्याच्या कुटुंबावर मोठं संकट आलं आहे.