'पानिपता'पासून ते 'उखाड' फेकेंगे पर्यंत; अमित शहांच्या भाषणातले 10 मुद्दे!
भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी रविवारी लातूरमध्ये पक्ष कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाषणा करताना युती संदर्भात शिवसेनेला अप्रत्यक्ष इशारा दिल्याने दोन्ही पक्षांमधला तणाव वाढणार आहे.
|
1/ 9
युती होईल की नाही त्या विचार करू नका. प्रत्येक बूथ जिंकण्याचा प्रयत्न करा. युती झाली नाही तरीही हरकत नाही एक एकाला उखडून फेकू.
2/ 9
2019 ची तिसरी पानिपतची लढाई आपण हरलो तर इतिहास बदलेल. 2019 काहीही करून जिंकायची आहे...कारण मोदी आपले नेतृत्व करत आहेत.
3/ 9
राहुल गांधींनी आपल्या खानदानाचा इतिहास बघावा त्यानंतर इतरांवर भ्रष्टाचाराचे आरोप करावेत.
4/ 9
राफेल प्रकरणी सुप्रीम कोर्टने चौकशी करण्याची आवश्यकता नाही असं म्हटलं आहे.
5/ 9
भाजपने राज्यात आणि केंद्रात एक पैशाचाही भ्रष्टाचार केला नाही. मोदी गरीब कुटुंबातून आले आहेत तरी ते देशाच्या उच्च पदावर पोहचले आहेत.
6/ 9
जलयुक्त शिवार मुळे महाराष्ट्रातील पाण्याची पातळी वाढली. हे देवेंद्र फडणवीस यांचं यश आहे.
7/ 9
निवडणूक जिंकण्यासाठी भाजपची विचारधारा लोकांपर्यंत पोहचवणे आवश्यक आहे. त्यातुनच निवडणुका जिंकता येतात.
8/ 9
जोश मध्ये निवडणूक जिंकता येत नाही तर होश मध्ये निवडणूक लढावी लागते. त्यामुळे कामाला लागा.
9/ 9
विरोधकांना हृदय विकाराचे झटके आले पाहिजे असा विजय 2019 मध्ये भाजपला मिळाला पाहिजे.