

आंबेनळी घाट अपघातामध्ये अजूनही काही ठोस पुरावे समोर आलेले नाहीत. त्यामुळे या प्रकरणाचा अजूनही निकाल लागलेला नाही.


गेल्या काही दिवसांआधी अपघातामध्ये बस चालवत असलेल्या मृत चालक प्रशांत भांबिड यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला.


त्यामुळे संतप्त 30 मृत कर्मचाऱ्यांचे नातेवाईक दापोली कोकण कृषी विद्यापीठाचे कुलसचिव डॉ. सुभाष चव्हाण यांच्या केबिनमध्ये धडकले.


२८ जुलै २०१८ मध्ये पोलादपूर-महाबळेश्वर राज्य मार्गावर कोकण कृषी विद्यापीठाच्या ज्या बसला अपघात झाला त्या अपघातात ३० कर्मचारी जागीच ठार झाले होते.


बस चालक प्रशांत भांबेड हा त्याच्या ताब्यातील बस (क्र. एम एच ०८ ई ९०८७) ही दापोली ते महाबळेश्वर दरम्यान घेऊन जात होता.


निष्काळजीपणाने आणि रस्त्याचे परिस्थितीकडे दुर्लक्ष केल्यामुळे अपघात झाल्याचा गुन्हा मृत प्रशांत यांच्यावर करण्यात आला आहे.


आंबेनळी दुर्घटना प्रकरणात प्रकाश सावंत देसाई दोषी असल्याचा आरोपसुद्धा मृतांच्या नातेवाईकांनी केला आहे.