

तेलगू सिनेसृष्टीचा मेगासुपरस्टार अल्लू अर्जुनचा आज ३६ वा वाढदिवस. अल्लूला अनेक सिनेमांसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला. त्याच्या वाढदिवसानिमित्तानेच आज आम्ही तुम्हाला त्याच्या खासगी आयुष्यातील रंजक गोष्टींबद्दल सांगणार आहोत.


अल्लूने २००३ मध्ये लालकृष्ण राघवेंद्र राव यांच्या ‘गंगोत्री’ सिनेमातून सिनेसृष्टीत पदार्पण केलं. या सिनेमात त्याने सहाय्यक अभिनेत्याची भूमिका साकारली होती. यानंतर २००४ मध्ये आलेल्या ‘आर्या’ सिनेमाने त्याला यशाच्या शिखरावर बसवलं.


आतापर्यंत अल्लूने २३ हून जास्त सिनेमात काम केलं आहे. पण हे वाचून सर्वांना आश्चर्य वाटेल की त्याचा आतापर्यंत एकही सिनेमा फ्लॉप झालेला नाही. अल्लू अर्जुन ज्या सिनेमात काम करतो तो प्रत्येक सिनेमा हिटच झाला आहे.


रिपोर्टनुसार, अल्लू एका सिनेमात काम करण्यासाठी १६ ते १८ कोटी रुपयांपेक्षाही जास्त मानधन घेतो. अल्लूचं ज्युबली हिल्सवर एक आलिशान बंगला आहे. या बंगल्यामुळे मुळ किंमत १०० कोटी रुपये असल्याचं म्हटलं जातं.


अल्लूचं खासगी आयुष्यही फार राजेशाही आहे. त्याच्याकडे रेंज रोवर, बीएमडब्ल्यू, ऑडी, जॅग्वार यांसारख्या एकाहून एक सरस गाड्या आहेत.