Ajith Kumar Father Dies : प्रसिद्ध अभिनेत्यावर कोसळला दु:खाचा डोंगर, 'थाला'ला सावरण्यासाठी पुढे आले कलाकार
Ajith Kumar Father P Subramaniam Mani Death Sarath Kumar and Celebs Pays Tributes : अजित कुमार यांना सावरण्यासाठी त्यांचे मित्र, कलाकार त्यांच्या घरी पोहोचले आहेत.
प्रसिद्ध अभिनेत्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. त्याला यातून सावरण्याचं बळ मिळूदे अशी प्रार्थना साउथ इंडस्ट्रीसह बॉलिवूडमधील कलाकार करत आहेत.
2/ 6
प्रसिद्ध अभिनेता अजित कुमार यांच्या वडिलांचं निधन झालं. वयाच्या 84 व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या निधनानंतर अजित कुमार यांना धीर देण्यासाठी कलाकार त्यांच्या घरी पोहोचले आहेत.
3/ 6
थाला अजित कुमार आपल्या अभिनयाने साउथ इंडस्ट्रितच नाही तर बॉलिवूडमध्येही प्रसिद्ध आहे. त्याच्या अभिनयाची नेहमी चर्चा होत असते.
4/ 6
अजित कुमार यांना सावरण्यासाठी त्यांचे मित्र, कलाकार त्यांच्या घरी पोहोचले आहेत.
5/ 6
साक्षी अग्रवाल, विजय अजित कुमार यांच्या निवासस्थानी पोहोचले आहेत. अजित कुमार यांनी स्ट्राँग राहायला हवं असंही चाहत्यांनी ट्विट केलं आहे.
6/ 6
अजित कुमार आपल्या कुटुंबासोबत काही दिवसांपूर्वी दुबईत फिरायला गेले होते. त्यांचे फोटो देखील सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. त्यानंतर वडील सुब्रमण्यम यांचं अचानक निधन झाल्याने दु:खाचा डोंगर कोसळला.