

वेस्ट इंडीजविरुद्ध दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात ३२१ धावा केल्यानंतरही भारतीय संघ सामना जिंकण्यात अपयशी ठरली. भारतीय क्रिकेटच्या इतिहासात तिसऱ्यांदा ३२१ हा आकडा वाईट ठरला आहे.


भारताने प्रथम फलंदाजी करत ३२१ धावांचा डोंगर रचला. टीम इंडियाटा कर्णधार विराट कोहलीने नाबाद १५७ धावांची खेळी खेळली.


भारताने जेव्हा ३२१ धावा केल्या तेव्हाच टीम इंडिया हा सामना जिंकणार नाही असे जवळपास निश्चित झाले होते.


याआधीही एकदिवसीय सामन्यात दोनदा टीम इंडियाने प्रथम फलंदाजी करत ३२१ धावा केल्या होता. या दोन्ही सामन्यात भारताला पराभवाचा सामना करावा लागला होता.


भारताने सर्वातआधी २००७ मध्ये पाकिस्तानविरुद्ध मोहालीत ३२१ धावा केल्या होत्या. पाकिस्तानने ४ गडी राखून हा सामना जिंकला होता.


गेल्यावर्षी आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमधअये श्रीलंकेविरूद् ओवलमध्ये ३२१ धावांची खेळी खेळली होती. श्रीलंकेच्या संघाने ४८.४ षटकात हा सामना आपल्या खिशात घातला होता.