“मस्त तेल मे फ्राई करके खा गया”; पाहा हेरा फेरीमधील खळखळवून हसवणारे मिम्स
‘पैसा ही पैसा होगा...’; ‘हेरा फेरी’चे धमाकेदार मिम्स पाहिले का?
|
1/ 11
'हेरा फेरी' हा बॉलिवूड इतिहासातील आजवरच्या सर्वोत्कृष्ट विनोदीपटांपैकी एक म्हणून ओळखला जातो.
2/ 11
या चित्रपटात अभिनेते परेश रावल, अक्षय कुमार आणि सुनिल शेट्टी यांनी अफलातून अभिनय केला होता.
3/ 11
2000 साली प्रदर्शित झालेल्या हेरा फेरीला आज तब्बल 21 वर्ष पूर्ण झाली आहेत.
4/ 11
चित्रपटाच्या 21 व्या वाढदिवसानिमित्त सुनील शेट्टीनं काही गंमतीशीर अनुभव प्रेक्षकांसोबत शेअर केले.
5/ 11
आयएमडीबीला दिलेल्या मुलाखतीत तो म्हणाला, "हेरा फेरीमध्ये अनेक नामांकित कलाकारांनी एकत्र काम केलं. परंतु कुठल्याच कलाकाराला विशेष वागणूक मिळाली नव्हती.
6/ 11
चित्रीकरणाचा वेळी आम्हाला चक्क वर्तमानपत्रांवर देखील झोपावं लागलं होतं.
7/ 11
कुठल्याही प्रकारचा मेकअप नव्हता की महागडे लोकेशन्स नव्हते. चक्क फाटके कपडे घालून कॅमेरासमोर उभं केलं जात होतं.
8/ 11
अक्षय तर कित्येक दिवस भोक पडलेली बनियान घालत होता. बाहेर फिरताना कोणी आम्हाला ओळखणारही नाही अशी अवस्था आमची होती.
9/ 11
परंतु कदाचित दिग्दर्शकाच्या अशा वागण्यामुळंच चित्रपट इतका सुपरहिट झाला. आम्ही खरोखर गरीब आहोत. हे भासवण्यात आम्ही यशस्वी झालो.
10/ 11
हेरा फेरी या ब्लॉकबस्टर विनोदीपटात अक्षय, सुनिल आणि परेश रावल यांच्यासोबतच गुलशन ग्रोवर, ओम पुरी, असरानी, तब्बू, मुकेश खन्ना यांसारख्या अनेक नामवंत कलाकारांनी काम केलं होतं.
11/ 11
आज तब्बव 21 वर्षानंतरही हा तितक्याच आवडीनं पाहिला जातो. हेरा फेरी हा भारतीय सिनेसृष्टीच्या इतिहासातील अजवरच्या सर्वोत्कृष्ट विनोदी चित्रपटांपैकी एक आहे.