

9 ऑक्टोबर 1874 रोजी 22 देशांनी स्वित्झर्लंडमध्ये युनिव्हर्सल पोस्टल युनियन स्थापन करण्याच्या करारावर स्वाक्षरी केली. तेव्हापासून दरवर्षी 9 ऑक्टोबरला जागतिक पोस्ट डे साजरा केला जातो.


भारत 1 जुलै 1876 मध्ये ‘यूनिव्हर्सल पोस्टल यूनियन’ चा सदस्य बनला आहे. रंजक बाब म्हणजे जगातील सर्वात उंचीवर असणारे पोस्ट ऑफिस आपल्या देशात आहे.


हिमाचलची राजधानी शिमलापासून जवळपास 500 किमीवर हे पोस्ट ऑफिस आहे. हे पोस्ट ऑफिस बघण्यासाठी आणि इथून पोस्ट कार्ड खरेदी करण्यासाठी मोठ्या संख्येने पर्यटक याठिकाणी दाखल होतात.


हिमाचल प्रदेशच्या लाहौल स्पीती जिल्ह्यातील काजा उपविभागातील हिक्किम गावात हे एक पोस्ट ऑफिस असून, हिक्किम गावात बांधलेले हे पोस्ट ऑफिस 4440 मीटर (14567 फूट) उंचीवर आहे. या गावात पोहोचण्यासाठी रस्ता आहे.


काजापासून 15 किमी अंतरावर हिक्किम गाव आहे. मोठ्या संख्येने पर्यटक येथे भेट देण्यासाठी येतात आणि त्यांच्या कुटुंबियांना आणि मित्रांना पोस्ट कार्ड पोस्ट करतात.