मराठी बातम्या » फोटोगॅलरी » देश » सीमावादावरून कर्नाटकात महाराष्ट्राविरुद्ध आंदोलन करणाऱ्या 'कन्नड रक्षण वेदिके संघटने'चा इतिहास काय? वाचा सविस्तर
सीमावादावरून कर्नाटकात महाराष्ट्राविरुद्ध आंदोलन करणाऱ्या 'कन्नड रक्षण वेदिके संघटने'चा इतिहास काय? वाचा सविस्तर
Maharashtra Karnataka Border Dispute: महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात सध्या कन्नड रक्षण वेदिके संघटना चर्चेत आहे. कन्नड रक्षण वेदिके संघटना बेळगाव सीमा प्रश्नावर आक्रमक झालीय
महाराष्ट्र कर्नाटक सीमावादात सध्या कन्नड रक्षण वेदिके संघटना चर्चेत आहे. कन्नड रक्षण वेदिके संघटना बेळगाव सीमा प्रश्नावर आक्रमक झालीय
2/ 7
कन्नड रक्षण वेदिके याचा अर्थ कर्नाटक संरक्षण मंच असा आहे. कन्नड भाषा अस्मिता, भूमीपुत्रांसाठी लढा, कन्नड संस्कृती संरक्षणासाठी संघटनेचे काम आहे.
3/ 7
जगानेरे वेंकटरामय्या यांनी कन्नड रक्षण वेदिकेची स्थापना केलीय. 2012 मध्ये संघटनेचे 60 लाख सभासद होते. 30 जिल्ह्यात 12 हजारांपेक्षा जास्त शाखा आहेत.
4/ 7
फक्त कर्नाटकातच नव्हे तर कन्नड रक्षण वेदिके संघटनेचा परदेशातही विस्तार झालाय.
5/ 7
महाराष्ट्र एकीकरण समितीने 2005 मध्ये बेळगाव महाराष्ट्रात विलीन करण्याचा ठराव मंजूर केल्यानंतर त्याला संघटेने विरोध केला होता.
6/ 7
कावेरी पाणीवाटपासंदर्भातही कन्नड रक्षण वेदिकेने लढा दिला आहे. त्यांनी कर्नाटकात बंदची हाक देत इशारा दिला होता.
7/ 7
तामिळनाडुसोबत असलेल्या पाणी वाटपाच्या मुद्द्यावर तामिळींविरोधातही कन्नड रक्षण वेदिकेने आंदोलन केलं होतं. कर्नाटकात तामिळ चित्रपटांना विरोध, तामिळ वाहिन्यांचे प्रक्षेपण बंद करण्याचे आंदोलनही त्यांनी केलेय.