पन्नाशीतील CM Bhagwant Mann यांच्याशी केलं लग्न; लग्नादिवशीच Gurpreet Kaur म्हणाली....
CM Bhagwant Mann - Gurpreet Kaur wedding : डॉ. गुरप्रीत कौर ही पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांची दुसरी पत्नी झाली आहे.
|
1/ 9
पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान आज दुसऱ्यांदा लग्नाच्या बोहल्यावर चढले. डॉ. गुरप्रीत कौर हिच्याशी त्यांनी लग्नगाठ बांधली आहे.
2/ 9
चंदीगडमधील त्यांच्या निवासस्थानी हे लग्न पार पडलं. एएनआयच्या रिपोर्टनुसार त्यांच्या लग्नात बँड, बाजा, बारात नव्हते. पण उत्साहाचं वातावरण चांगलंच होतं.
3/ 9
त्यांच्या लग्नात त्यांच्या नातेवाईकांसह दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि दिल्लीतील आम आदमी पार्टीचे नेते राघव चड्ढा उपस्थित होते.
4/ 9
त्यांच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत. ज्यात भगवंत मान यांनी गोल्डन कलरची शेरवानी आणि पिवळ्या रंगाची पगडी घातली. तर गुरप्रीत कौर लाल रंगाच्या ड्रेसमध्ये दिसते.
5/ 9
आईच्या इच्छेसाठी भगवंत यांनी दुसऱ्यांदा लग्न केलं. गुरप्रीत ही त्यांच्यासाठी आई आणि बहिणीची पसंती आहे.
6/ 9
गुरप्रीत कौर ही डॉक्टर आहे. ती मूळची हरयाणातील असून आता पंजाबच्या राजपुरात राहते. आपचे सदस्य आणि गुरप्रीतचे काका गुरजिंदर सिंह नट यांनी दिलेल्या माहितीनुसार या कुटुंबात दोन वर्षांपासून लग्नाची बोलणी सुरू होती.
7/ 9
लग्नाच्या चर्चेनंतर अखेर गुरप्रीतने आपली पहिली प्रतिक्रिया दिली. लग्नादिवशीच सकाळी ती सोशल मीडियावर व्यक्त झाली. ट्विटरवर तिने आपली प्रतिक्रिया दिली.
8/ 9
गुरप्रीतने ट्विटरवर आपला फोटो पोस्ट केला आहे. ज्यात ती वांगी कलरच्या सलवार सूटमध्ये दिसते. हाताला मेहंदी लावलेल्या गुरप्रीत गोड हसताना दिसते आहे. 'दिन शगना दा चड्या', असं कॅप्शन तिने या फोटोला दिलं आहे.
9/ 9
मुपन्नाशीच्या उंबरठ्यावर असलेल्या मान यांचं हे दुसरं लग्न. 2015 साली त्यांनी पहिल्या पत्नीपासून घटस्फोट घेतला. तिच्यापासून त्यांना 17 वर्षांचा मुलगा दिलशान आणि 21 वर्षांची मुलगी सीरत कौर अशी दोन मुलं आहेत.