

मातीत पुरलेल्या नवजात बाळाला अनेकांनी पाहिलं. सर्वत्र त्याची चर्चा होत होती, परंतु त्याला हात लावायला कोणीही तयार होत नव्हतं. परंतु कुंदन भंडारी या व्यक्तीने त्या बाळाची अवस्था पाहून तातडीने पुढील पावलं उचलली.


घटनास्थळी जमलेल्या लोकांनी पोलिसांना फोन केला होता आणि पोलीस येईपर्यंत त्यांची वाट पाहात होते. पण कुंदन भंडारी यांनी 'जे होईल ते होईल, परंतु आता या बाळाचा जीव वाचवण्याचा प्रयत्न करायला हवा' असं म्हणत त्या नवजात बाळाला उचललं.


बाळाच्या नाकात, तोंडात माती गेली होती. कुंदन त्या बाळाच्या नाका-तोंडातील माती साफ करत थेट रुग्णालयाकडे निघाले. रस्त्यातच त्यांना एक रुग्णवाहिका दिसली, त्यांनी त्या बाळाला त्यांच्याकडे सोपावलं.


बाळाला सिव्हिल रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. रुग्णालय प्रशासनाने याबाबत कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.