उत्तराखंडमध्ये निवडणुकांआधीच आता राजकीय हालचालींना वेग आला आहे. कॉंग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांनी आपले काही जुने फोटो शेयर केले तर भाजप नेते आणि माजी मुख्यमंत्री तीरथ सिंह रावत यांनी राजस्थानमधील आपल्या एका मित्राच्या मुलीच्या लग्नात चक्क डान्स केला आहे. आता हे फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहेत.
एका धर्मशाळेत आपल्या मुलीचं लग्न करणाऱ्या चमोली यांनी तीरथ सिंह रावत यांचे आभार मानताना म्हटलं की 'तीरथ आपल्या शब्दाला जागणारी व्यक्ती आहे, त्यांनी मला शब्द दिला होता की मी तुझ्या मुलीच्या लग्नाला येईन आणि ते आले' त्यांच्या या मित्रतेची तुलना आता काही लोकांनी कृष्ण आणि सुदामाबरोबर करायला सुरूवात केली आहे. त्याचवेळी आता माजी मुख्यमंत्री हरिश रावत यांचेही काही फोटो व्हायरल होत आहे.