

देशासाठी महिला गुप्तहेरांचंही मोठं योगदान आहे. त्या जीवाची बाजी लावतात.पाहा अशाच काही गुप्तहेर महिला.


नूर इनायत खान - भारतीय मूलतत्त्वाची ही ब्रिटिश गुप्तहेर. नूर यांनी फ्रान्समध्ये ब्रिटनतर्फे जर्मनी आणि हिटलरच्या विरोधात हेरगिरी केली होती. इनायत खान यांचा परिवार फ्रान्स आणि ब्रिटनमध्ये राहात होता. नूर यांचं फ्रेंच चांगलं होतं. नूर फ्रेंच रेडिओमध्ये काम करायच्या. 1943मध्ये त्यांनी जर्मनी आणि हिटलर यांची हेरगिरी केली होती.


दुसऱ्या महायुद्धात त्यांनी फ्रान्समध्ये नर्स म्हणून काम केलं. त्यांच्यासोबत आलेल्या तमाम फ्रेंच गुप्तहेरांना नाझींनी ठार मारलं. नूर यांना 10 महिने मरणयातना दिल्या गेल्या. पण त्यांच्याकडून कुठलंच रहस्य बाहेर आलं नाही. टिपू सुलतानच्या वंशाच्या नूर यांच्या मरणानंतर फ्रान्सनं त्यांना जाॅर्ज क्राॅस या उच्च सन्मानानं गौरवलं.


एका काश्मिरी व्यावसायिकाच्या सहमत खान लेक होत्या. गुप्तहेर म्हणून त्यांना पाकिस्तानात पाठवलं होतं. त्यासाठी त्यांचं लग्न एका पाकिस्तानी लष्कर अधिकाऱ्याशी करून दिलं होतं.


त्यांच्यावर राजी सिनेमा आला होता. सहमत यांनी निकाहानंतर पाकिस्तानी सेनेची गुप्त माहिती भारताला दिली. परत भारतात आल्या तेव्हा त्या गरोदर होत्या. त्यांचा मुलगा लष्करात होता. हरिंदर सिक्का यांनी त्यांच्या आयुष्यावर काॅलिंग सहमत ही कादंबरी लिहिली.


सरस्वती राजामणी - सरस्वती म्यानमारमध्ये जन्मल्या होत्या. त्यावेळी त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात भाग घेतला होता. त्या सुभाषचंद्र बोस यांच्या नॅशनल आर्मीत दाखल झाल्या. इंग्रजांच्या कँपमध्ये पुरुषांच्या वेषात राहून माहिती पुरवली.


माधुरी गुप्ता या भारतीय राजकारणात होत्या. पण त्यांच्यावर पाकिस्तानसाठी हेरगिरी केल्याचा आरोप होता. इस्लामाबादमध्ये त्या भारतीय अधिकारी म्हणून काम करत होत्या. 22 एप्रिल 2010मध्ये त्यांना भूतानमधल्या सार्क संमेलनाच्या तयारीसाठी बोलावलं होतं. दिल्ली विमानतळावर इंटेलिजन्स ब्युरोनं त्यांना पोलिसांकडे सोपवलं.