दिवाळीच्या पहिल्याच दिवशी एका अपघात मोठं नुकसान झालं असून एक लहान मुलगा जखमी झाला आहे. हिमाचल प्रदेशातील उना जिल्ह्यात, एक भरधाव स्कॉर्पिओ दिवाळीच्या सामानाने भरलेल्या एका दुकानात घुसली. या अपघातात एक लहानगा जखमी झाला आहे. पोलिसांनी याबाबत गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शनिवारी सकाळी एक अनियंत्रित भरधाव कार दुकानात घुसली. ज्यात दुकानदाराचा बाहेर उभा असलेला मुलगा जखमी झाला. मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याला जवळच्या स्थानिक रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. या अपघातात, कोणतीही जीवित हानी झालेली नाही. परंतु सामानाचं मोठं नुकसान झालं आहे.