TRAIच्या नव्या नियमांमुळे तुमचं टीव्ही बघणं 25 टक्क्यांनी महागणार का?
ट्रायनं लागू केलेल्या नव्या नियमानुसार ग्राहकाच्या त्याच्या आवडीचे चॅनल्स निवडता येतील. शिवाय, निवडलेल्या चॅनल्सचे पैसे ग्राहकाला भरायचे आहेत. पण, त्याचा भुर्दंड ग्राहकाला बसणार असल्याचं हा नवा रिपोर्ट सांगतो आहे.


TRAIनं लागू केलेल्या नव्या नियमावालीनुसार ग्राहकाला त्याच्या आवडीचे चॅनल्स किंवा हवे तेवढेच चॅनल्स निवडीचे स्वातंत्र्य आहे. १ फेब्रुवारीपासून हा नवा नियम लागू झाला आहे.


केवळ हवे असलेले चॅनल्स निवडा आणि त्या चॅनल्सकरता पैसे मोजा असा नवीन नियम आहे. सुरूवातीला या नव्या नियमाला केबल ऑपरेटर्स तसेच डीटीएच सेवा पुरवणाऱ्या कंपनींकडून विरोध देखील झाला.


TRAIच्या नव्या नियमांचा फायदा ग्राहकांना मोठ्या प्रमाणावर होणार असं बोललं जात आहे. पण, प्रत्यक्षात मात्र ग्राहकांचं टीव्ही पाहणं हे 25 टक्क्यानं महागणार असल्याचा दावा क्रिसिल या कंपनीनं केला आहे.


नव्या नियमांमुळे ग्राहकांच्या टीव्ही बिलावर परिणाम होईल असं क्रिसिल कंपनीचे सीनिअर डायरेक्टर सचिन गुप्ता यांचं म्हणणं आहे.


यापूर्वीच्या दरांची तुलना करता 10 चॅनल्स पाहणाऱ्या ग्राहकांचे बिल 230 ते 240 रूपयावरून 300 रूपये होईल असं सचिन गुप्ता याचं म्हणणं आहे. पण, पाच किंवा त्यापेक्षा कमी चॅनल्स सबक्राईब करणाऱ्यांना मात्र याचा फटका बसणार नाही असं सचिन गुप्ता याचं म्हणणं आहे.


क्रिसिल कंपनीच्या दाव्यानुसार या नव्या नियमावलीचा फायदा सर्वात लोकप्रिय चॅनल्सना होणार आहे. पण, जे चॅनल्स सर्वात लोकप्रिय नाहीत त्यांना मात्र याचा फटका बसणार आहे. तर काही चॅनल्स बंद देखील होऊ शकतात.


डीटीएम आणि केबल ऑपरेटर्सना यांना काही प्रमाणात फायदा होईल. पॅकेजिंग मागे फायदा नसला तरी ग्राहकांमागे मात्र डीटीएम आणि केबल ऑपरेटर्सना याचा फायदा होणार आहे. असं क्रिसिल कंपनीच्या रिपोर्टमध्ये नमबद करण्यात आलं आहे.