

जयपुर, 20 नोव्हेंबर : भीलवाडामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी चर्चेत असलेली UPSC टॉपर टीना डाबी पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षा 2015 मध्ये टीनाने टॉप केलं होतं. तर अतहर हा दुसऱ्या क्रमांकवर होता. या दोघांनी 2018 मध्ये लग्न केलं होतं. मात्र या IAS दाम्पत्याने घटस्फोटासाठी फॅमिली कोर्टात अर्ज दाखल केल्याची बातमी समोर आली आहे.


आम्ही पुढे एकत्र राहू शकत नाही, असे कारण देत घटस्फोटाचा अर्ज दाखल करण्यात आला आहे. दोघेही 2016 बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. सध्या टीका अर्थ विभागात संयुक्त सचिव आणि आमिर अतहर ईजीसीच्या सीईओपदी कार्यरत आहे. 2018 मध्ये दोघांनी लग्नगाठ बांधली होती. मात्र लग्नाच्या दोन वर्षातच त्यांनी घटस्फोटाची अर्ज दाखल केला आहे.


2018 मध्ये लग्न झाल्यानंतर टीनाने आपल्या ट्विटर हँडलवर नावाच्या पुढे खान आडनाव लावलं होतं. त्याशिवाय तिने Delhiite, Kashmiri Bahu, IAS, in that order लिहित स्वत:ची माहिती दिली होती. मात्र काही दिवसांपूर्वी त्यांनी हे सर्व हटवून अकाऊंट पर्सनल असल्याचं लिहिलं होतं.


टीना हिने यूपीएससी सिव्हिल सेवा परीक्षेत टॉप केलं होतं तर तिचा पती अतरह दुसऱ्या क्रमांकावर होता. ट्रेनिंगदरम्यान दोघांमध्ये जवळीक निर्माण झाल्याचे सांगितले जात आहे. कोरोनाच्या दरम्यान टीना राजस्थानमधील भीलवाडा एसडीएम पदावर तैनात आहे. भीलवाडामध्ये कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यात टीनाला यश आल्याने ती खूप चर्चेत होती.


दिल्ली विद्यापीठात पॉलिटीकल सायन्सची टॉपर असलेली टीनाने बारावीतदेखील पॉलिटीकल सायन्स आणि इतिहारात 100 पैकी 100 गुण मिळवले होते. आयएएस झाल्यानंतर टीना हरियाणा कॅडरमध्ये रुजू झाली होती. टीना आपल्या लग्नामुळे खूप चर्चेत होती. तिने काश्मिरच्या अतहरसोबत लग्न केलं होतं. मुस्लीम तरुणाशी लग्न केल्यामुळे तिच्यावर खूप टीका केली जात होती. अनेकांनी तर तिला जीवे मारण्याची धमकी दिली होती.