

रिलायन्स इंडस्ट्रीचे चेअरमन मुकेश अंबानी यांचा आज ( 19एप्रिल ) वाढदिवस. ते 62 वर्षांचे झालेत. दोन दिवसांपूर्वीच अमेरिकेच्या टाइम मॅगझीननं मुकेश अंबानी यांचा 2019च्या सर्वात 100 प्रभावी व्यक्तींच्या यादीत समावेश केलाय. टाइम मॅगझीननं जाहीर केलेल्या 100 प्रभावी लोकांच्या यादीत 3 भारतीयही आहेत. त्यात अरुंधती काटजू आणि मेनका गुरुस्वामी आहेत. फोर्ब्सच्या बिलियनर्सच्या यादीप्रमाणे मुकेश अंबानी यांच्याकडे 42.1 अब्ज डाॅलर्सची संपत्ती आहे. भारतीय चलनात याची किंमत 2718 अब्ज आहे.


आज त्यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला अशा त्यांच्या काही गोष्टी सांगणार आहोत ज्या वाचून तुम्हीही तुमचं भविष्य शानदार बनवू शकता.


तुमचं लक्ष्य नक्की करा आणि ते साध्य करायला मेहनत करा - मुकेश अंबानींनी नेसकाॅममध्ये सांगितलं होतं, जीवनात पुढे जायचं असेल तर तुम्हाला तुमचं लक्ष्य पक्कं करायला हवं. नाही तर तुम्ही मार्गावर भरकटू शकता. मुकेश अंबानी यांनी आपल्या कुठल्याही कामाचं लक्ष्य नेहमीच ठरवलं होतं.


कुठल्याही समस्येपासून पळू नका - समस्येपासून दूर पळण्यापेक्षा तिचा सामना करा. जाणून घ्या समस्या कुठून सुरू झालीय ते. तिच्या मूळापर्यंत जा. व्यावसायिक आयुष्य आणि वैयक्तिक आयुष्यात येणाऱ्या अडचणींचं कारण तुम्ही शोधलंत तर तुम्हाला उपायही सापडू शकतात.


अपयशाला घाबरू नका - मुकेश अंबानी यांनी नेसकाॅममध्ये सांगितलं होतं की असा कुणीही व्यक्ती नाही जिच्या आयुष्यात अपयश आलेलं नाहीय. अपयशाला घाबरून जाऊ नका. तुम्ही अयशस्वी झालात म्हणजे तुम्ही प्रयत्न करताय. तिलाच पुढे जाण्याची ताकद समजा.